करियरची माहिती देणारं भारतीय वायुसेनेचं नव ॲप लाँच; असे करा डाऊनलोड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

अनेकांना अर्ज कसा करावा? केव्हा करावा? याची माहिती मिळत नाही, अशा तरुणाईसाठी भारतीय वायुसेनेने करियरची सविस्तर माहिती देणारे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे.

नवी दिल्ली : तरुणाईला भारतीय वायुसेनेमध्ये  (IAF) भरती होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असते, त्यामुळे इंडियन एअर फॉर्स भरतीसाठी इच्छूक उमेदवार अर्ज करतात. मात्र अनेकांना अर्ज कसा करावा? केव्हा करावा? याची माहिती मिळत नाही, अशा तरुणाईसाठी भारतीय वायुसेनेने करियरची सविस्तर माहिती देणारे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे.

 

इंडियन एअर फॉर्सचे चीफ ऑफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी MY IAF नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आल्याची माहिती दिली. 'ज्या उमेदवारांना वायुसेनेमध्ये भरती व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हे अँप अतिशय उपयोगी येणार आहे, डिजिटल इंडियाचा प्रमुख भाग म्हणून हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे असे भदोरिया म्हणाले. 'उमेदवार या ॲपचा वापर डिजिटल स्वरूपात करू शकतील, भारतीय वायुसेनेच्या अधिकारी आणि एयरमॉन दोन्ही पादाच्या निवडप्रक्रिया, अभ्यासक्रम, वेतन, भरती आदींची सविस्तर माहिती या ॲपद्वारे उमेदवपारांना मिळणार आहे. हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स यांच्या सहयोगातून विकसित करण्यात आले असे भदौरिया यांनी सांगितले.

कोठे उपलब्ध होणार अँप

अँड्रॉइड स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअर मध्ये MY IAF मोबाईल अँप विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. त्याचबरोबर वायुसेनेचा इतिहास आणि बलिदान दिलेल्या शुर विरांच्या शौर्य गाथा युजर्स ॲपमध्ये वाचायला मिळणार आहेत. त्यामुळे वायुसेनेचा इतिहास पुन्हा एकदा तरुणाईला वाचण्यासाठी डिजिटल स्वरुपात मिळणार आहे. 

भारतीय वायुसेनेने यापुर्वी एक गेमिंग ॲप लॉन्च केलं होते, त्याद्वारे सर्जिकल स्ट्राइक दहा वेगवेगळ्या मशीनद्वारे खेळण्याची मुभा देण्यात आली होती. 'इंडियन एयरफोर्स अ क्युट अबो' नावाचे हे अॅप निर्माण करण्यात आले होते. विंग कमांडर अभिनंदन सारखा एक कॅरेक्टर या गेममध्ये निर्माण करण्यात आले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News