भारताने विंडीजला अक्षरक्ष: लोळवले

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • 3-0 ने घातली मालिका खिशात 
  • दीपक चाहर सामनावीर 
  • कृणाल पांड्या  मालिकावीर 

गयाना - दीपक चहरची भेदक सुरवात आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी जळकाविलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीज दौऱ्यातील पहिल्या टी 20 मालिकेत निर्भेळ यश मिळविले. तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने मंगळवारी विंडीजचा सात गडी राखून पराभव केला. भारताने मालिका 30 अशी जिंकली. 

विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 146 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सलामीची जोडी लवकर गमावली. पण, त्यानंतर कोहली आणि पंत यांनी 106 धावांची भागीदारी करताना भारताचा विजय सुकर केला. विजय दृष्टिपथात असताना कोहली (59) बाद झाला. त्यानंतर पंतने धावांवर नाबाद राहताना मनीष पांडेच्या साथीत भारताचा विजय साकार केला. भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा केल्या. त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार कोहलीचा निर्णय दीपक चहरने सार्थकी लावला. 

चहरने आपल्या पहिल्या दोन षटकांतच विंडीजचे तीन फलंदाज 14 धावांत गारद केले. या सुरवातीच्या खराब सुरवातीनंतरही तब्बल सात वर्षांनी मायदेशात आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या किएरॉन पोलार्डने विंडीजचा डाव सावरला. त्याला निकोस पूरनची साथ मिळाली. अर्थात, पूरनकडे केवळ बघ्याची भूमिकाच निभवायचे काम राहिले. त्यांच्या 76 धावांच्या भागीदारीत त्याचा वाटा फक्त 17 धावांचा होता. सैनीने ही जोडी फोडताना पूरनला बाद केले. अर्धशतकी खेळी करून पोलार्डही बाद झाला. शेवटी रोवमॅन पॉवेल याने 20 चेंडूंत आक्रमक 32 धावांची खेळी करून विंडीजचे आव्हान वाढवण्याचे काम केले. 

संक्षिप्त धावफलक 
वेस्ट इंडिज 20 षटकांत 6 बाद 146 (पोलार्ड 58 -45 चेंडू, 1 चौकार, 6 षटकार, पॉवेल नाबाद 32 -20 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, दीपक चहर 3-4, नवदीप सैनी 2-34) पराभूत वि. भारत 19.1 षटकांत 3 बाद 150 (विराट कोहली 59 -45 चेंडू, 6 चौकार, रिषभ पंत नाबाद 65 -42 चेंडू, 4 चौकार, 4 षटकार, थॉमस 2-29)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News