विश्वगुरू भारत

सुजाता बानगुडे
Tuesday, 22 September 2020

आता आपला भारत पुन्हा कसा व केव्हा विश्वगुरू बनेल याची आस सगळ्यांना लागली आहे.पुन्हा विश्वगुरु भारत बनण्यासाठी भारताला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल? भारत विश्वगुरू बनण्यास तत्पर आहे का? असे खुप प्रश्न वर डोकवत आहे.

विश्वगुरू भारत

विश्वगुरू म्हणजे जगाचा शिक्षक. विश्वगुरु भारत ही संकल्पना मांडताना भारत विश्वगुरु होता आणि भारत विश्वगुरु बनणार अशा दोन भागांमध्ये याची विभागणी होते.

प्रथम भारत विश्वगुरु होता:

भारत पुन्हा विश्वगुरू बनणार असे आपण अनेक वेळा ऐकत आलो आहे. तर पुन्हा विश्वगुरु बनणार म्हणजे नेमके काय? याचा अर्थ भारत पहिला विश्वगुरू होता का आणि केव्हा? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. प्राचीन काळामध्ये संपुर्ण जग भारताला विश्वगुरू मानत होते. कारण त्यांना भारताच्या उत्तुंग ज्ञानाची त्यावेळी प्रचिती आली होती.

प्राचीन काळी विश्वगुरु भारताने जगाला अनेक देणग्या दिल्या, जसे योगा हे शारिरीक आणि मानसिकरित्या निरोगी राहण्याचा महामंत्र भारताने संपूर्ण जगाला दिला. आणि आताच्या काळात योगा हा प्रत्येकाच्या जीवनातील घटक बनला आहे. महर्षि आर्याभट्ट यांनी शुन्याचा शोध पहिला भारतामध्ये लावला.त्यानंतर भौतिकशास्त्र, विज्ञान, ज्योतिषशास्त्र, शल्यचिकित्सा अशा अनेक क्षेत्रात योगदान विश्वरूपी भारताने जगाला दिले.

पुष्कळ भाषांची जननी असलेली संस्कृत भाषेचा जन्म भारतामध्ये झाला. सर्वकाही वेदांमध्ये आहे,असे पूर्वीपासुन ऋषी म्हणत आले आहे असा जगातील पहिला ग्रंथ वेद याची उत्पत्ति विश्वगुरू भारतामध्ये झाली. विश्वगुरू भारत प्राचीनकाळी संपुर्ण जगाचा मार्गदर्शक बनला होता.

भारत विश्वगुरु बनणारः

आता आपला भारत पुन्हा कसा व केव्हा विश्वगुरू बनेल याची आस सगळ्यांना लागली आहे.पुन्हा विश्वगुरु भारत बनण्यासाठी भारताला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल? भारत विश्वगुरू बनण्यास तत्पर आहे का? असे खुप प्रश्न वर डोकवत आहे.

भारताला विश्वगुरू बनण्यासाठी पुढील विचारधारामध्ये बदलणे गरजेचे वाटते.

जात-धर्म: देशामध्ये जात-धर्म हा वादविवादाचा विषय बनतो. त्यामुळे माणुसकी ही जात आणि माणुसकी हा धर्म हे तत्व प्रत्येकाच्या मनात रूजले पाहिजे.

शिक्षण: जगाला मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे ज्ञान भरपुर असले पाहिजे त्यासाठी आपली शिक्षण पद्धत ही फक्त परीक्षार्थी न बनता अभ्यासार्थी बनली पाहिजे.

भ्रष्टाचार: भ्रष्टाचार हा देशाची उन्नति थांबण्यासाठीचे खुप मोठी अडचण आहे. त्यामुळे भ्रष्टाचार रोखणे अत्यंत गरजेचे आहे.

संस्कृती: आपली संस्कृती ही आपल्या देशाची शान आणि मान आहे आणि ती जोपासणे हे आपले परम कर्तव्य समजले पाहिजे.

अर्थव्यवस्था: आता या कोरोनाच्या काळात आपण सर्वांनीच पाहिले आहे कि आपली अर्थव्यवस्था खुप मंदावली आहे. त्यामुळे प्रत्येक युवाने आपल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. स्वतःच्या देशात नोकरी अथवा उद्योगधंदे केले पाहिजे. स्वदेशी गोष्टींला महत्त्व दिले पाहिजे.

कृतज्ञता: आपल्या मातृभूमिबद्दल प्रत्येकाला कृतज्ञता वाटली पाहिजे. आपल्या देशासाठी नवीन काहीतरी करून दाखवण्याचा जोश सर्वामध्ये आला पाहिजे.

संविधान: आपले संविधान हा आपल्या देशाचा पवित्र ग्रंथच आहे. त्यामुळे त्याचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य बनले पाहिले.

तसेच प्रथम देशाला आदर्श देश बनवले पाहिजे. त्यासाठी दोन वेळेचे जेवण सर्वांना मिळाले पाहिजे. शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना मिळाला पाहिजे. स्रीभ्रूण हत्येला  पूर्णविराम मिळाला पाहिजे. बालविवाहासारख्या अनिष्ठ प्रथेला आळा घातला पाहिजे.

या बदलांनंतर ज्याप्रमाणे संपूर्ण जगाने प्राचीन काळी आपल्या भारताला विश्वगुरू म्हणुन स्वीकारले होते त्याचप्रमाणे पुन्हा स्वीकार करतील. आपल्या देशाची संस्कृती, सभ्यता, प्रगत तंत्रज्ञानामुळे भारत तत्पर विश्वगुरू होईल.

फिरसे नयी होगी शुरूआत

होगा बुलंद होसला हमारा

नये रंग ढंग होंगे सबके

एक ही ध्यास होगा मन मैं

विश्व गुरू बनेगा राष्ट्र हमारा

 

- सुजाता बानगुडे

टीवाय बीएससी (संगणक शास्त्र), एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News