भारताने नागरिकत्व कायदा मागे घ्यावा, नाहीतर...; शाहिद आफ्रिदीचं ट्विट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019
  • मोदींची वेळ आता संपत आलीय, कारण हिंदुत्वाच्या विचारसरणीचा संपूर्ण देशभरातून विरोध होताना पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती  विधेयकावरून देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असताना प्रत्येकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आता यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने देखील टीका केली आहे. आपल्या ट्विटरच्या माध्यमातून त्याने मोदींवर निशाणा साधला आहे. 

"मोदींची वेळ आता संपत आलीय, कारण हिंदुत्वाच्या विचारसरणीचा संपूर्ण देशभरातून विरोध होताना पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारतात मोदींना विरोध करण्यात येत आहे. भारत सरकारने नागरिकत्व कायदा लवकरात लवकर मागे घ्यावा, नाहीतर त्याच फळ मोदींना भविष्यात मिळेल'. असं देखील शाहिद आफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. 

आधीच वातावरण तापलेलं असताना, या ट्विट वरून पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील अनेकदा आफ्रिदीने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यावेळी देखील अनेकांच्या विरोधाला त्याला तोंड द्यावं लागलं होते. आता पुन्हा एकदा वादग्रस्त टीकेमुळे तो चर्चेत आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News