भारत पोहोचला थेट फायनलमध्ये, अजूनपर्यंतच्या गुणांंमुळे मिळाली संधी

यिनबझ टीम
Thursday, 5 March 2020
  • गेल्या काही दिवसांरासून सिडनी दौऱ्यावर असलेल्या भारताने टी-20 वर्ल्ड कप मालिकेत फायनलमध्ये धडक मारली आहे.
  • ग्रृप अमध्ये असलेल्या भारताचा आजचा सेमी फायनलचा सामना ग्रृप बमध्ये असलेल्या इंग्लंडशी होणार होता.

सिडनी - गेल्या काही दिवसांरासून सिडनी दौऱ्यावर असलेल्या भारताने टी-20 वर्ल्ड कप मालिकेत फायनलमध्ये धडक मारली आहे. ग्रृप अमध्ये असलेल्या भारताचा आजचा सेमी फायनलचा सामना ग्रृप बमध्ये असलेल्या इंग्लंडशी होणार होता. मात्र सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. अजूनपर्यंतच्या मालिकेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे अखेर भारताला विजयी घोषीत करण्यात आले.

सिडनी मैदानावर हा सकाळी 11.06 वाजता हा सामना होणार होता, मात्र याचवेळी पावसाने हजेरी लावण्याने क्रिकेट बोर्डाकडून हा निर्यण घेण्यात आला. आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत पोहोचण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. 2009, 2010 आणि 2018 या तीन वेळेस भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. याच मैदानावर दुपारी ऑस्ट्रेलिया विरुध्द दिक्षण अफ्रिका यांच्यातला सेमी फायनलचा सामना रंगणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News