भारत आमुचा देश महान

सानिया पटेल
Friday, 14 August 2020
  • १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण भारतात साजरा होऊ लागला.
  • या दिवशी आपण अभिमानाने आपल्या भारत देशाचा झेंडा फडकवतो.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण भारतात साजरा होऊ लागला. या दिवशी आपण अभिमानाने आपल्या भारत देशाचा झेंडा फडकवतो. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. ब्रिटिशांच्या जोखड्यातून भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाला आपली स्वतंत्रता प्राप्त झाली. आपल्या देशासाठी स्वातंत्र दिन म्हणजे एक अभिमानाचा, गौरवाचा दिवस म्हणून मानला जातो. या विशेष पर्वणीला जुलमी ब्रिटिश राजवटींच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वातंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञता पूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. आपला भारत देश परंपरेने नटलेला असल्याने सर्वजण त्या परंपरेने एकत्र राहतात.

सध्या आपल्या देशावर आलेल्या कोरोनाच्या महामारीत आपल्या सगळ्यांनाच एक धडा मिळाला आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील लोकांना वेगळ्या जीवन पद्धतीशी जुळवून घेणे भाग पडत आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या परिस्थितीला जखडावे लागत आहे त्यामुळे मानसिक आरोग्यावर त्याचा मोठा ताण येत आहे. लॉक डाऊन मुळे कामाचा ताण, आर्थिक, नोकरी बाबत अनिश्चितता, मानसिक आजार अश्या अनेक धोक्यांमध्ये वाढ झाली आहे या समस्या लोकसंख्येच्या सर्व स्तरांमध्ये जाणवत आहेत तरी देखील एक देश बांधव म्हणून आपण आपले प्रामाणिक प्रयत्न मात्र सोडले नाही. आपण आपली देशभावना या संकट समयी जागृत ठेवून प्रत्येकाला मदत करूनच पुढे सरसावत आहोत आणि अशा काळात ही खरी "देशप्रेमी" भावना आपल्याला आपल्या आजूबाजूला जाणवताना दिसते,  म्हणूनच आपल्याला आपल्या भारत देशाचा अभिमान वाटतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News