आयसीसी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीच दुसरं स्थान कायम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020
  • आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ९ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली याने अव्वल फलंदाजांच्या यादीत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.

दुबई : आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ९ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली याने अव्वल फलंदाजांच्या यादीत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. कसोटी मालिकांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा पहिल्या क्रमांकावर असून भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश हा टॉप १० च्या यादीत आहे. भारतीय संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे हे अव्वल फलंदाजांच्या यादीत आठव्या आणि दहाव्या स्थानी आहेत. कोरोनाच्या महामारी काळानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात क्रिस वोक्स आणि शान मसूद यांनी उत्तम फलंदाजी करून आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली. तसेच आयसीसीच्या अव्वल फलंदाजांच्या यादीत पाकिस्तान चा फलंदाज बाबर आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांनी देखील आपले सहावे आणि नववे स्थान कायम राखले आहे. 

यंदा आयसीसीच्या नव्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह हा आठव्या स्थानी असून अव्व्ल दहामध्ये असणारा हा भारताचा एकमेव गोलंदाज आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट किमन्स हा पहिल्या स्थानावर कायम असून दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा नील वगरन आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉड हा अव्वल गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजापेक्षा तो फक्त सात गुणांनी मागे आहे. 

आयसीसी कसोटी सामान्यांच्या नव्या क्रमवारीत फारसे बदल झालेले दिसत नाहीत. तसेच अष्टपैलू खेळाडूंमधील अव्वल पाच स्थानांमध्ये देखील कोणतेही बदल झालेले नसून भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याने आपले अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील तिसरे स्थान कायम राखले आहे. भारताचा आणखीन  एक खेळाडू रविचंद्रन अश्विन अष्टपैलूंच्या यादीत पाचव्या स्थानी असून इंग्लंडचा बेन स्टोक्स हा पहिल्या स्थानी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News