स्वातंत्रदिनी इरफान पठाणचे ट्विट झाले व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020

इरफान पठाणने एक ट्विट केले असून ते प्रचंड व्हायरल झाले आहे.

स्वातंत्रदिनी इरफान पठाणचे ट्विट झाले व्हायरल

आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेकजण शुभेच्छा देत असतात, परंतु काहीजण असे आहेत की ते शुभेच्छा अनोख्या पध्दतीने देतात. आज भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रिकेटपटू इरफान पठाणने एक ट्विट केले असून ते प्रचंड व्हायरल झाले आहे.

आज अनेक खेळाडूंनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, पंतप्रधानांनी सुध्दा लाल किल्ल्यावरून जनतेले संबोधित करत असताना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कोरोना महामारीच्या काळात  'सेवा परमो धर्मा'ची भावना आपल्यासोबत आहे असेही ते म्हणाले. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात दिवसरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणा-या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, संरक्षण व्यवस्था यांचा सुध्दा भाषणात उल्लेख केला.

" मेने ख्वाब में सोने की चिडीया को परवा चढते हुए देखा हैं, चिडीयाने दाने कहीं रंग के खाए हो, लेकीन उसके जिस्मपे रंग सिर्फ तिरंगाही दिखता हैं..." हे ट्विट सकाळी इरफान पठान याने केल्याने त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून अनेकांनी रिट्विट केलेले आहे. सोशम मीडीयावर इरफान खानचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News