इंदापूर तालुक्यात जयंत पाटलांनी अधिका-यांना दिल्या 'या' सुचना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

इंदापूर तालुक्यात जयंत पाटलांनी अधिका-यांना दिल्या 'या' सुचना

इंदापूर तालुक्यात जयंत पाटलांनी अधिका-यांना दिल्या 'या' सुचना

इंदापूर तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत जयंत पाटील यांनी नुकतीच बैठक घेतली. इंदापूरात सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

.खडकवासला कालवा व सर्व वितरकांची दुरुस्ती करण्याचे तसेच निरा डावा मूळ कालवा पूर्णपणे नव्याने वाढीव वहन क्षमतेचा करण्यासाठी सर्व्हे करून कालवा अस्तरीकरण व क्राँक्रिटीकरण करण्याचे अंदाजपत्रक तात्काळ शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना जयंत पाटील दिले आहेत.

नीरा नदीवरील जांब, खोरोची, चिखली, वालचंदनगर, कुरवली, निमसाखर, निर निमगाव, पिठेवाडी व बोराटवाडी तसेच भिमा नदीवरील भाट निमगाव, टण्णू, नरसिंगपूर येथील केटीवेवर बंधारे दुरूस्ती, काँक्रीटीकरणासाठी अंदाजपत्रके तात्काळ कृखोवि मंडळाकडे सादर करून निधी मंजूर करण्यात यावा असे निर्देश सुध्दा दिले.

शेटफळ हवेली तलावाची उंची वाढवण्याचे अपूर्ण काम व सांडवा वितरीकेचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ५६०० हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्व्हे करण्याचे आदेशही बैठकीत दिले.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News