स्मार्टफोनचे वाढते व्यसन; नव्या पिढीच्या गळ्यात घाला वेसन

सूनयना अजात, यवतमाळ
Thursday, 25 July 2019
  • आज 21 व्या शतकात पदार्पण करत असतांना तांत्रिक पातळीवर आपली खुप प्रगती झाली आहे.
  • स्मार्टफोनचे या युगात आघाडीचे स्थान आहे. सहा महिन्याच्या बाळापासून ते 70 वर्षाच्या आजोबा जवळ स्मार्टफोन बघायला मिळतो. ​

आज 21 व्या शतकात पदार्पण करत असतांना तांत्रिक पातळीवर आपली खुप प्रगती झाली आहे. स्मार्टफोनचे या युगात आघाडीचे स्थान आहे. सहा महिन्याच्या बाळापासून ते 70 वर्षाच्या आजोबा जवळ स्मार्टफोन बघायला मिळतो. जितका तो उपयोगी, तितकेच त्याचे दुष्परिणाम आहेत. विशेष करून बालपणात जेव्हा मुलांची शारीरिक, बौद्धीक, भावनिक वाढ होत असते त्यावेळेस या स्मार्टफोनमुळे मुलांवर काय दुष्परिणाम होऊ शकतात, ते टाळण्यासाठी काय उपाययोजना अवलंबल्या पाहिजे. याबाबत आपणा सर्वांना “उमलती फुले” या मोहिमेच्या माध्यमातुन अवगत करण्याचा मानस डॉ.हर्षलता गायनर यांचा आहे, त्यांच्या मुलाखतीत बोलतांना त्या म्हणाल्या की  सर्व मुल बौद्धिक, भावनिक पातळीवर अग्रेसर राहतील. कारण, आजच्या मुलांवर आपल्या देशाचे उज्वल भविष्य विसंबुन आहे. मी लॅन्डमार्क फोरम अभ्यासक्रम करत आहे. त्यामाध्यमातून मला ही कल्पना सूचली.

सोशल मिडीया उदा.- वॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, गेम्स्, शॉपींग अॅप्स् सारख्या गोष्टी मुलांना आकर्षित करतात. विशेष करून किशोरवयात संवादासाठी महत्वाचे माध्यम आहे. पण कदाचित आपणाला कल्पना नसेल 5 तासापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणार्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण 71% आहे. 

स्मार्टफोनमुळे होणारे दुष्परिणाम :

1) 2 वर्षात मेंदूची वाढ तिप्पट होते. त्यावेळेस भावनिक विकास होत असतो.बालपणात स्मार्ट फोनमुळे हा विकास खुंटतो आणि त्याचा दुष्परिणाम आई वडिलां सोबत संबंधावर होतो.

2) व्यसन - तांत्रिकदृष्ट्या स्मार्टफोनवर सर्व गोष्टी सहज उलपब्ध होतात. त्यामुळे मुलं आवेग नियंत्रण, आव्हान स्विकारणे शिकू शकत नाही. काही जणांना तर मोबाईलशिवाय आयुष्य जगणे भितीदायक वाटते

3) स्वनियंत्रणापासून मुलांना शांत करण्यासाठी व मन वळविण्यासाठी स्मार्टफोनचा सर्रास वापर पालकांमार्फत केल्या जातो. त्यामुळे मुलं जिद्दी होतात, स्वनियंत्रण तयार होत नाही.

4) झोपेच्या वेळी मोबाईल वापरल्याने झोपेवर परिणाम होऊन अपुरी झोपे होते. स्मरणशक्ती, एकाग्रतेवर परिणाम होतो व साहाजिकच अभ्यासावर परिणाम होतो.

5) तांत्रिक वापरामुळे कौशल्य विकास, नवनिर्माण करण्याची क्षमता खुंटते. गणित व विज्ञानासाठी कौशल्यविकास होणे आवश्यक आहे.

6) स्मार्टफोनच्या माध्यमातुन जास्त संपर्कात असल्यामुळे प्रत्यक्ष संवाद कौशल्याचा विकास होत नाही. प्रत्यक्ष संवादातून अनुभवायला मिळणारे चेहर्यावरचे हावभाव, आवाजातले चढउतार, शारीरिक भाषा समजत नाही. नातेसंबंध विकसीत होत नाही.

7) साहजिकच भावनिक विकास न झाल्याने मानसिक आजारांमध्ये वाढ होते. किशोर वयातच उदासिनता जडते. सायबर गुन्ह्याचे प्रमाण आजकाल वाढतच आहे. रागीटपणा, हिंसकवृत्ती वाढीस लागते.

8) शारीरिक हालचाली, मैदानी खेळ खेळत नसल्याने लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. तसेच निरोगी, खाण्यापिण्याच्या जाहिरातीमुळ पण मुलांवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे भविष्यात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार होऊ शकतो.

9) स्मार्टफोन शिवाय जगणे अशक्य वाटत असल्याने बाथरू6मपासून तर जेवणाच्या ताटापर्यंत तो सोबती असतो त्यामुळे जंतुसंक्रमण होऊन आजारांना निमंत्रण मिळते तसेच किरण संसर्गामुळे कर्करोग संभवतो, स्मार्टफोनमधून निघणार्या प्रकाशकिरणांमुळे डोळ्यांना इजा होऊन आंधळेपणा संभवतो

उपाययोजना :-

1) स्मार्टफोन वापरासाठी ठराविक वेळ निश्चित करा.

2) 1 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल देऊच नये. 2 ते 4 वर्षापर्यंतत 1 तासापेक्षा जास्त मोबाईल वापरायला देऊ नये.

3)  नो फोन झोन तयार करा. उदा. बेडरूम, डायनिंग टेबल.

4) विशेष कौटुंबिक क्षणी फोन वापरास बंदी घाला. उदा- वाढदिवस, कौटुंबिक सुट्या, मुलांसोबत संवाद साधा की त्यांना काय हवे आहे. शाळेत काही समस्या तर नाही ना _!!

5) सर्वात महत्वाचे म्हणजे पालक म्हणून स्वत:च्या फोन वापरावर नियंत्रण आणा, कारण मुलं अनुकरणानेच शिकतात.

6) मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करा. संगीत, नृत्यासारखे छंद जोपासायला मदत करा.

7) ध्येय निश्चित करण्यासाठी मदत करा.

8) मोबाईल आतिवापराचे 5 धोके व कमी वापरामुळे होणारे 5 फायदे नमूद असणारे स्मरणपत्रिका घरामध्ये दर्शनी भागात लावा

9) मुलांना जबाबदारी लक्षात येईस्तोवर स्वतंत्र स्मार्टफोन देऊ नका. आवश्यकतेच्य वेळी पालकांनी स्वत:चा मोबाईल वापरायला द्यावा.

10) स्मार्टफोनमध्ये वापरायची वेळ निश्चित करण्यासाठी मॉनिटरींग अॅप असतात. मुलांनी किती वेळ कुठला अॅप वापरला ते कळते. फोनचा वापर कशासाठी केल्या जातो यावर लक्ष ठेवा आणि ते पण मुलांना सांगुन मुलांच्या अपरोक्ष नाही.

11) स्मार्टफोन कंटाळवाणा वाटण्यासाठी सेटींग बदलून ग्रे स्केल मोड करावा.

12) स्मार्टफोन वापरावर बंदी - 2015 मध्ये तायवानमध्ये 2 वर्षाखालील मुलांना स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे. फ्रान्समध्ये पण मुलांसाठी फोन वापरासाठी नियम असल्याने मुलांची शैक्षणिक प्रगती उत्तम होते, असे निदर्शनास आले आहे.

13) सर्वात महत्वाचे इतके करूनही आवाक्यात येत नसेल तर मानसिक रोग तज्ञाचा सल्ला घ्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News