बाबो! कोरोनाग्रस्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020
  • 65 कर्मचारी कोरोनामुक्त

मुंबई : अत्यावश्‍यक सेवा देताना बेस्ट उपक्रमाच्या 137 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून, बरे झालेल्या 65 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 137 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी काही बसचालक आणि वाहक असून, उर्वरित कर्मचारी तांत्रिक आणि विद्युत विभागांतील आहेत.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहेत. रेल्वे, मेट्रो, बस, रिक्षा, टॅक्‍सी, ऍप आधारित कॅब बंद असल्यामुळे बेस्ट उपक्रमावर ताण आला आहे. अत्यावश्‍यक सेवा म्हणून दररोज 1500 बसगाड्या धावत असून, 3000 पेक्षा जास्त चालक-वाहक कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक निरीक्षक आणि परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत. अपंग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजाराहून जास्त कर्मचाऱ्यांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News