पचनशक्‍ती वाढविण्यासाठी तुम्हाला 'हे' गरजेचे आहे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019

पावसाळ्यात हवामान दमट असते. त्यामुळे, साहजिकच पचनशक्तीही मंदावते. त्यामुळे या ऋतूत अपचन टाळून पचनशक्ती चांगली राहण्यासाठी योग्य काळजी घ्यायला हवी. अपचन वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते.

पावसाळ्यात हवामान दमट असते. त्यामुळे, साहजिकच पचनशक्तीही मंदावते. त्यामुळे या ऋतूत अपचन टाळून पचनशक्ती चांगली राहण्यासाठी योग्य काळजी घ्यायला हवी. अपचन वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. अपचन ही आरोग्यविषयक एक सामान्य समस्या आहे. अपचनाला दूर ठेवण्यासाठी आपणही काही गोष्टी करू शकतो. 

पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर असल्याने शक्‍यतो पचायला हलका, ताजा आहार घ्यावा.तेलकट, तुपकट पदार्थ तसेच कोबी, फ्लॉवरसारख्या पचनास जड भाज्याही टाळाव्यात.उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे ते कटाक्षाने टाळावेत.

  • एका वेळी भरपेट जेवू नये. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. अधूनमधून थोडे खावे. ते नीट पचू द्यावे. अपचनाचा त्रास होत असल्यास पुरेशी विश्रांती घ्या. 
  • भरपूर पाणी प्या. मात्र, फ्रिजमधील पाणी टाळावे. योगासने, प्राणायाम करा. त्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होईल. धूम्रपान करू नका. त्याचप्रमाणे कॉफी, शीतपेय, अल्कोहोलचे सेवनही टाळावे. अपचन एखाद्या गंभीर आजाराचेही पूर्वलक्षण असू शकते. त्यामुळे याबाबत वेळेवर तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.आपल्या डॉक्‍टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News