'या' घटनेची रेल्वेच्या इतिहासात नोंद होणार; एका युवतीसाठी राजधानी धावली ५३५ KM

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 September 2020

आजपर्यंत एका प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने कधीही गाडी सोडली नाही. त्यामुळे रेल्वे इतिहासातली ही प्रथमच घटना मानावी लागेल. या घटनेची रेल्वे इतिहासात नोंद होणार हे मात्र निश्चित आहे.

रांंची : तरुणीच्या हट्टा पुढे रेल्वे प्रशासन हतबल झाले. तरुणीची अनेक वेळा समजूत काढूनही तिने हट्ट सोडला नाही. शेवटी रेल्वे प्रशासनाला तिच्या हट्टापुढे झुकावे लागले. एका तरुणीसाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल ५३५ किलो मिटर राजधानी एक्सप्रेस चालवली. तरुणीला रात्री १ वाजून  ४५ मिनिटांनी राचीला सोडले. आजपर्यंत एका प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने कधीही गाडी सोडली नाही. त्यामुळे रेल्वे इतिहासातली ही प्रथमच घटना मानावी लागेल. या घटनेची रेल्वे इतिहासात नोंद होणार हे मात्र निश्चित आहे.  

टाना भक्तांच्या आंदोनामुळे डालटनगंज रेल्वे स्टेशनवर राजधानी एक्सप्रेस थांबली होती. 'आंदोलनामुळे रेल्वे पुढे जाणार नाही' अशी घोषणा स्टेशन मास्तरने केली. त्यामुळे रेल्वेच्या ९३० प्रवाशांपैकी ९२९ प्रवाशी डालटनगंज स्टेशनवर उतरुण इतर वाहनांची पुढचा प्रवास केला. मात्र महाविद्यालयीन तरुणी अनन्याने राजधानी एक्सप्रेसने राची जाण्याचा निश्चय केला. रेल्वे अधिकाऱ्यांनी अनन्याची समजूत घातली मात्र ती मानायला तयार नव्हती. 'घरी जाईन तर राजधाणी एक्सप्रेसनेचं जाईन. बस ने जायचे असते तर मी रेल्वेचे तिकीत कशाला काढले असते? बसच तिकीट काढून गेले असते. राजधानीच तिकीट काढलय तर त्यानेच जाणार' अस खडसावून अनन्या रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. शेवटी रेल्वे प्रशासनाने सायंकाळी चार वाजता राजधानी एक्सप्रेस परत गयाला घेऊन गेले आणि गोमे, बोकारो मार्गे राची पोहचले. 

रेल्वे प्रशासन अनेक वेळा आंदोलकांना हाटवण्यास तयार नसते, मात्र प्रवाशांची अशा परिस्थितीत अडचन निर्माण होते. रेल्वे प्रशानाच्या आडमुठे धोरनावर मात करण्यासाठी अन्यन्या सारख्या तरुणीने घेतलेला पुढाकार रेल्वे प्रशानाला चांगलाच महागात पडला आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News