आरक्षणासंदर्भात वडेट्टीवरांची चुकीची माहिती; मराठा आंदोलकांनी केला निषेध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली नाही मात्र, मंत्री वडेट्टीवार चुकीची माहिती विधानभवनात सांगतात त्यामुळे आंदोलकांनी काळ्या पट्या लावुन वडेट्टीवरा यांचा जाहीर निषेध केला.

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला सध्या स्थगिती दिली, जेव्हा सर्वोच्च न्यायालय आदेश देईल तेव्हा मराठा आरक्षणार निर्णय घेऊ. मराठा आरक्षणाची सुनावनी येत्या 13 मार्च रोजी होणार आहे असे मत आपत्ती व्यवस्थान तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी मंगळवारी विधानभवनात व्यक्त केले.

37 दिवसापासून मराठा समाजाचे आंदोलनकर्ते बेमुदत उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य खालावले आहे. त्यांना केव्हा नियुक्तीचे आदेश दिले जातील? असा प्रश्न भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधानभवनात उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, 'मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली' अशी संदीग्ध माहीती विभानभवनात दिल्यामुळे मराठा आंदोलकांनी वडेट्टीवार यांच्यावर रोष व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली नाही मात्र, मंत्री वडेट्टीवार चुकीची माहिती विधानभवनात सांगतात त्यामुळे आंदोलकांनी काळ्या पट्या लावुन वडेट्टीवरा यांचा जाहीर निषेध केला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी केव्हा होणार हे सदस्यानाचं माहिती नाही तर मराठा समाजाच्या कल्याणाचे निर्णय वडेट्टीवार कसे घेतील? असा प्रश्न मराठा आंदोलकानी उपस्थित केला. 

37 दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहोत. अऩ्नत्याग केल्यामुळे 18 आदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतो. ज्यांची परिस्थिती सुधारली आहे त्यांना आंदोलन स्थळावर हवलण्यात आले. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपुर्ण देशभर आंदोलनाचे पडसाद उमटतील. 
- बालाजी शिंदे, मराठा आंदोलक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News