जाणून घ्या, धूम्रपान सोडण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

आपल्या शरीराला हानी पोहोचवत आहे हे आपल्याला कळते परुंतु जडलेल्या व्यसनामुळे यामधून बाहेर पडणे तितकेच अवघड आहे. तर आज आपण धुम्रपानातून बाहेर पडण्याच्या काही महत्वपूर्ण टिप्स जाणून घेणार आहोत. 

अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये एक क्रेझ आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे धूम्रपानाची. व्यसनाबरोबर फॅशन म्ह्णून तरुणाई धुम्रपानाकडे वळते. तर व्यसन असलेला वर्ग तर वेगळाच आहे. धूम्रपान हे एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला मानसिक त्रासामध्ये मदत करते. हे आपल्या शरीराला हानी पोहोचवत आहे हे आपल्याला कळते परुंतु जडलेल्या व्यसनामुळे यामधून बाहेर पडणे तितकेच अवघड आहे. तर आज आपण धुम्रपानातून बाहेर पडण्याच्या काही महत्वपूर्ण टिप्स जाणून घेणार आहोत. 

१. एकादी वाईट गोष्ट सोडण्यामागे कोणते ना कोणते तरी मुख्य कारण असतेच, तसेच धूम्रपान सोडण्यामागचे तुमचे कारण तुम्हाला शोधावे लागेल. जे तुम्हाला धूम्रपान सोडण्यास मदत करेल. 

२. धूम्रपानच्या माध्यमातून निकोटीन आपल्या शरीरात जाते, त्यामुळे त्याची सवय होते व आपल्याला व हे व्यसन आपल्याला जडते. जर आपण अचानक धूम्रपान बंद केले तर निकोटिनचा प्रवाह थांबतो ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो. तर अशावेळी निकोटिनला पर्याय शोधा. बाजारात सध्या निकोटिनसारखाचेचं पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा अवलंब करा. 

३. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

४. स्वतःवर विश्वास आणि संयम ठेवा. 

५, मद्यपानापासून लांब राहा. 

६. नियमित व्यायाम करा. 

६. नेहमी आनंदी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून धूम्रपानाचा विचार मनात येणार नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News