रोजच्या वापरातील महत्वाच्या टिप्स

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019
 • मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक-दोन केळी खावीत.

 

 • मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक-दोन केळी खावीत.
 • काजू व इतर ड्राय फ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लवंगा टाका.
 • कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात.
 • स्वयंपाकाची जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. स्वच्छ होतील. 
 • जळलेल्या भांड्यात पाणी टाकून उकळवा. त्यानंतर भांडे खाली उतरवून त्यात बेकिंग सोडा टाका. भांडे स्वच्छ होईल.
 • बागकाम केल्यानंतर हात स्वच्छ राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुऊन टाका.
 • पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडे मीठ कालवून घ्या.
 • घरातील कोणताही पंखा (एक्झॉट फॅनसुद्धा) स्वच्छ ठेवायचा असल्यास रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा.
 • भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा.
 • कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News