संविधानाचे महत्त्वाचे धडे अभ्यासक्रमातून CBSE ने वगळले 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

विद्यमान केंद्र सरकार तसेही, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद ,याबाबत प्रतिकूल भूमिका घेत आहे. खरं तर हे धडे चांगला नागरिक घडविणारे आहेत, म्हणून आवश्यक आहेत

संविधानाचे महत्त्वाचे धडे अभ्यासक्रमातून CBSE ने वगळले 

खरं तर संविधान हा विषयच शाळा कॉलेजेस, विद्यापीठात, शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य केला पाहिजे. संविधानाचे विविध वैशिष्टये शालेय, महाविद्यालयीन जीवनापासून मुलामुलींच्या मनावर संस्कारित झाले पाहिजे. आम्ही, संविधान फौंडेशनच्या वतीने मान. प्रधानमंत्री, मानव संसाधन विकास मंत्रालय यांना 2018 मध्ये निवेदन पाठविले होते. मानव संसाधन विकास मंत्रालयाने उत्तर दिले की शालेय अभ्यासक्रमात संविधान हा विषय आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा यापूर्वीच निवेदन पाठवून विनंती केली आहे की, महाराष्ट्रातील शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ मध्ये संविधान विषय अनिवार्य करावा अशी माहिती इ. झेड. खोब्रागडे (आयएएस) यांनी सांगितली. 

तसेच आता, टीव्ही चॅनेल वर बातमी प्रसिद्ध झाली आहे की, सीबीएससीच्या नागरिकशास्त्र पुस्तकातील नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद आणि इतर काही " महत्वाचे विषय काढून टाकायचा निर्णय कोरोनाचे कारण सांगून अभ्यासक्रम कमी करण्याच्या नावाने, सरकारने घेतला. हे विषय म्हणजे संविधानाचा गाभा पैकी आहेत. विद्यार्थ्यांनी तेच शिकू नये असे सरकारला वाटते असे खोब्रागडे यांनी स्पष्ट केले. 

विद्यमान केंद्र सरकार तसेही, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद ,याबाबत प्रतिकूल भूमिका घेत आहे. खरं तर हे धडे चांगला नागरिक घडविणारे आहेत, म्हणून आवश्यक आहेत. संविधानिक मूल्यांचा संस्कार तरुण पिढीवर होणे आवश्यक आहे. संविधान जागृतीसाठी सरकार 26 नोव्हेंबर ला संविधान दिवस देशभर साजरा करते. तेव्हा, कोरोनाचे कारण सांगून, अभ्यासक्रमातून संविधानाचे वरील विषय/धडे वगळणे सर्वथा चुकीचे आहे. संविधानाच्या मूळ गाभाला हात लावल्या सारखे आहे. सरकारने हा निर्णय बदलावा आणि 'संविधान' या नावाने अनिवार्य विषय सगळ्या अभ्यासक्रमासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमधून सुरू करावा. विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी कर्मचारी, मीडिया, आणि नागरिकांना संविधान सम जेल तर देश घडेल अशी भूमिका इ. झेड. खोब्रागडे मांडली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News