NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020
  • कोरोनाच्या महामारीमुळे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी लागणारा बारावीचा निकाल यंदा मात्र तब्बल एक महिना उशीरा जाहीर झाला.
  • बारावी विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थी दरवर्षी NEET आणि JEE ची परीक्षा देऊन वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवतात.

नवी दिल्ली :- कोरोनाच्या महामारीमुळे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी लागणारा बारावीचा निकाल यंदा मात्र तब्बल एक महिना उशीरा जाहीर झाला. बारावी विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थी दरवर्षी NEET आणि JEE ची परीक्षा देऊन वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवतात. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रात प्रवेश मिळविण्याकरीता JEE आणि NEET या परीक्षांमध्ये मिळालेले गुण अत्यंत आवश्यक असतात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनाकडून केली जात होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ जुलै रोजी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या परंतु कोविड १९ ह्या संसर्ग रोगाशी आज संपूर्ण भारत लढत असताना या परिस्तिथीत विद्यार्थ्यांचे आरोग्य केंद्र सरकारने धोक्यात घालू नये अशी विनंती याचिका कर्त्यांनी केली होती. देशातील अकरा राज्यातील अकरा विद्यार्थ्यांनी या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या NEET आणि JEE परीक्षांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.    
परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा ह्या वेळापत्रकानुसारच होतील असा निर्णय दिला. परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका ६ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. परंतु परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात टाकल्यासारखे होईल तसेच परीक्षा झालीच नाही तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे ही नुकसान होईल असे सांगून NEET आणि JEE परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. त्याचप्रमाणे धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असे देखील न्यायालयाकडून सांगण्यात आले. न्यायमूर्ती अजय मेहेता यांच्या खंडपीठाने याचिकेच्या सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहेता यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची परीक्षा केंद्रावर पूर्णपणे काळजी घेतली जाईल ह्या आश्वासनाची नोंद घेतली. त्यामुळे NEET आणि JEE ह्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार सप्टेंबर महिन्यातच होतील अशी शक्यता वर्तवली जात असून यावेळी प्रत्येक  विद्यार्थ्याची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News