मिठ व्यवसायासाठी सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 April 2020
  • संचार बंदीमध्ये मिठागरेही बंद करण्याचे धोरण पोलिसांनी अवलंबिले होते. त्यातून अखेर मार्ग काढत मीठ उत्पादकांना पास देऊन त्यातून तोडगा काढण्यात आला.

विरार: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासना मार्फत देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे बहुसंख्य उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. फक्त जीवनावश्‍यक वस्तू व शेती व्यवसाय त्यामधून वगळण्यात आले आहेत. परंतु मीठ उत्पादन हे शेती व्यवसायात मध्ये मोडत नाही, तर ते उद्योगामध्ये मध्ये गणले जाते. परंतु संचार बंदीमध्ये मिठागरेही बंद करण्याचे धोरण पोलिसांनी अवलंबिले होते. त्यातून अखेर मार्ग काढत मीठ उत्पादकांना पास देऊन त्यातून तोडगा काढण्यात आला आहे.

वसई येथील मिठागरे पोलिस प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगच्या कारणास्तव बंद केली व मजुरांना आप आपल्या गावी पाठवले. व तेथील मीठ उत्पादन व्यवसाय बंद झाले. मीरा भाईंदर मध्ये देखील पोलिस मीठ उत्पादकांना आपल्या मिठागरात जाण्यासाठी अटकाव करू लागले. त्यामुळे त्यांनी सॉल्ट डीपार्टमेंटशी संपर्क साधला. सॉल्ट डीपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना याबाबत आपल्या शिलोत्र्यी संघाला जिल्हाअधिकारी व मीरा भाईंदर प्रशासना सोबत चर्चा व समन्वय साधण्यास सुचित केले.

त्या अनुषंगाने शिलोत्र्यी संघाने जिल्हाआधिकारी व मीरा भाईंदर प्रशासना सोबत पत्र व्यवहार करून समन्वय साधला व त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, मिठ हे अत्यावश्‍यक खाद्यपदार्थांमध्ये येते. व खाद्यपदार्थांसाठी, फार्मा इंडस्ट्रीज साठी अत्यावश्‍यक बाब आहे. त्यामुळे मिठ उत्पादन सुरू राहणे गरजेचे आहे. महापालिकेकडून पासेस मीठ उत्पादकांच्या प्रतिनिधींना किंवा मालकांना रोजच्या रोज मिठागरात जाण्या येण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनातर्फे ओळख पत्र ( पास) मिळवून देण्यात आली. एकूण 12 मिठागरातील प्रतिनिधीना पास मिळवून देण्यात आले. अशी माहिती संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली. याकामी सॉल्ट विभागाचे आगरवाल यांनी त्यांचे वरिष्ठ सी रघु यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर शिलोत्री संघाने त्यांच्याशी पत्रव्यव्हार केल्यावर यातून अखेर तोडगा निगल्याने मीठ उत्पादकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News