यशस्वी जीवनासाठी अमिताभ बच्चनचा महत्वपुर्ण सल्ला; पाहा काय म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

अमिताभ बच्चन कोरोनाच्या महाभयंकर संटकातून बाहेर आले. मात्र कोणताही जागा वाजा न करता पुन्हा कामाला लागले. देशातला सर्वात मोठा टीव्ही शो 'कोन बनेगा करोडपती?' यंदाच्या सिजनचे प्रोमो बच्चनने घरीत शुट केले.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आपल्या फॉन्सना दरवेळी काहीतरी नवीन सांगतात. त्यामुळे बच्चन सतत चर्चेत राहतात. पैसा, प्रसिद्धी सहज मिळत नाही त्यासाठी कष्ट, परीश्रम, अनेक दिवस मेहमन करावी लागते. या सर्व परिस्थितीशी दोन हात केल्यानंतर सुखी, समाधानी जीवन जगता येते. त्यासाठी बच्चनने ट्विट करुन आपल्या फॉन्स महत्त्वपुर्ण सल्ला दिला आहे.

पाहा ट्विट

बच्चनने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोन मक्याचे कणसं त्यांनी शेअर केले आहेत. त्यातला एक मक्का दिसायला खुप सुंदर आहे, तर दुसरा भाजलेला आहे मात्र दिसायला कुरुप आहे. फोटो खाली कच्चा मका 5 रुपये तर भाजलेला 20 रुपये असे कॉप्शन दिले आहेत. त्याखाली बच्चनने एक संदेश दिला लिहला. 'जीवनात किंमत्त वाढवायची असेल तर चटके सहन करावे लागली' असे म्हटले आहे. जीनवात यशस्वी होण्यासाठी मक्या सारखं भाजून निघाव लागेल, त्रास होईल त्रास तो त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे जीवनात यश मिळेल असा मोलाचा संदेश दिला आहे.

अमिताभ बच्चन कोरोनाच्या महाभयंकर संटकातून बाहेर आले. मात्र कोणताही जागा वाजा न करता पुन्हा कामाला लागले. देशातला सर्वात मोठा टीव्ही शो 'कोन बनेगा करोडपती?' यंदाच्या सिजनचे प्रोमो बच्चनने घरीत शुट केले. लॉकडाऊमुळे चित्रिकरणाचा बट्टाबोळ झाला होता, मात्र सरकारने पुन्हा चित्रिकरणाला परवानगी दिली अशा परिस्थिती 65 वर्षापैक्षा अधिक वय असणाऱ्यां व्यक्तीना चित्रिकरण करता येणार नाही अशी अट घातली. मात्र न्यायालयाने अखेर सरकारच्या नियमाला लाल कंदील दिला. आणि काही नियम व अटी पाळून 65 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना चित्रिकणाचे अधिकार दिला, त्यामुळे बच्चन पुन्हा एकदा केबीसीच्या कामाला लागले आहेत. त्यांनी केबीसीच्या सेटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News