जिमबरोबरच ध्यानधारणेला महत्त्व, पहा कोण सांगतय

अनुष्का शर्मा, अभिनेत्री
Monday, 22 April 2019

चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, कधी या भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते, तर कधी कमी करावे लागते. मी शरीर मेंटेन ठेवण्यासाठी योगावर जास्त विश्‍वास ठेवते. योगामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. 

चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, कधी या भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते, तर कधी कमी करावे लागते. मी शरीर मेंटेन ठेवण्यासाठी योगावर जास्त विश्‍वास ठेवते. योगामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मनही निरोगी राहते. भूमिकांच्या असलेल्या विविध गरजेनुसार शरीरावर काम करण्याची गरज असते. यासाठी मी जिम करत असते. माझा जिम ट्रेनर माझ्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून घेतो. यामुळे निरोगी व फिट राहण्यास मदत होते. 

मनःशांतीसाठी ध्यानधारणा करण्याकडे मी कटाक्षाने लक्ष देते. ध्यानधारणेलाही मी व्यायामाएवढेच महत्त्व देते, त्यामुळे त्याचा माझ्या दैनंदिनीमध्ये समावेश असतो. यामुळे दिवसभर असलेला मनावरचा ताण दूर होण्यास मला मदत होते. मला नृत्य करायला आवडते आणि नृत्य हा एक प्रकारचा चांगला व्यायाम आहे. यामुळे मी रोज अर्धा तास नृत्य करत असते. 

तुम्ही खात असलेल्या गोष्टींचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. यामुळे खाण्याच्या बाबतीतलेही नियम मी काटेकोरपणे पाळते. मी जंक फूड पूर्णपणे टाळते. मला प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम वाटत असल्याने मी मटण व चिकन या गोष्टींचा त्याग केला आहे. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये दोन अंड्यांचा पांढरा भाग व सोबत एक ग्लास फळांचा रस आणि काही ताजी फळे खाते. दुपारच्या जेवण्यासाठी मी घरूनच डबा नेते. यामध्ये पोळी, भाजी, डाळ असा हलका आहार असतो. त्यानंतरच्या नाश्‍त्यामध्ये मी चीज टोस्ट आणि नारळाचे पाणी घेते. रात्री मात्र प्रोटिनयुक्त हलका आहार घेते व झोपायला जाण्यापूर्वी दूध पिते.

आपल्या शारीरिक गरजांबरोबर आपले मनही निरोगी राहिले पाहिजे यासाठी मी जीमपासून ध्यानधारणापर्यंत सर्वच गोष्टींना महत्त्व देते. मी बाहेरगावी शूटिंगसाठी किंवा कामानिमित्त गेल्यावर चालते किंवा पळते. या काळातही डाएट पाळण्याकडे माझे लक्ष असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News