हरतालिका व्रताचे महत्त्व

शिल्पा नरवडे
Friday, 21 August 2020
  • आज हरतालिका तृतीया भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते.
  • या व्रताची अशी परंपरा आहे की, हिमालयाची कन्या पार्वती हिचे शंकरावर खूप प्रेम जडले होते.
  • मात्र शंकराला त्याची मुळीच कल्पनाच नव्हती.
  • शंकर हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने हिमालयात खडतर तपश्चर्या सुरू केली.

आज हरतालिका तृतीया भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते. या व्रताची अशी परंपरा आहे की, हिमालयाची कन्या पार्वती हिचे शंकरावर खूप प्रेम जडले होते. मात्र शंकराला त्याची मुळीच कल्पनाच नव्हती. शंकर हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने हिमालयात खडतर तपश्चर्या सुरू केली. सतत १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने ही उपासना केली आणि अखेर शंकर तिच्या व्रताने प्रसन्न झाला. आणि तिचा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला. यासाठी पार्वतीने हे व्रत मनोभावे पणे करून पूजा केलेली.

तेव्हापासून लग्न झालेल्या महिलांपासून ते कुमारिका देखील दरवर्षी हरतालिकेचे व्रत न चुकता करतात. निर्जळी किंवा न खात हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे. सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. हरतालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी खास पूजा केली जाते. या दिवशी शिव पूजा केली जाते. हर हे शिवचे नाव आहे. त्यामुळे या व्रताला हरितालिका तृतीया असे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने हा उपवास आपल्याला हवा तसा किंवा योग्य पती मिळावा या उद्देशाने केला जातो.

सकाळपासून अगदी निर्जल हा उपवास करावा. मात्र तब्बेत ठीक नसल्यास या दिवशी फळ खाल्ली तरी चालतील. संध्याकाळी शिव आणि पार्वतीची उपासना करावी. या पूजेवेळी महिला श्रृंगार करून उपस्थित असणे अत्यंत महत्वाचे आहे. यामागचे कारण की, स्त्रिया या साजशृंगारामध्ये अतिशय सुंदर दिसतात. त्यानंतर पार्वतीला सौभाग्य वस्तू अर्पण करून आशिर्वाद घ्यावा. मुली आणि महिला एकत्र येऊन वाळूच्या सहाय्याने भगवान शंकरांची पिंड तयार करून मोठ्या आनंदाने पूजा करतात, अशा प्रकारे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

महाराष्ट्रात ‘हरतालिका’ तृतीयेच्या दिवशी पूजण्याची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा आरती केली जाते. नंतर नैवेद्य दाखविला जातो आणि या शंकराच्या पिंडाचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यानंतर उपास सोडला जातो. पंच पक्वानांचे भोजन केले जाते. याला पारणे असेही म्हंटले जाते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News