नजर आणि नजरिया

Thursday, 29 October 2020

भारतीय क्रिकेटसंघाच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यामधून वगळण्यात आलेल्या सूर्यकुमार यादव याने बुधवारी क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. ४२ बाॅलमध्ये ७५ रन काढणाऱ्या सूर्यकुमारने केवळ मुंबई इंडियन्सला विजयी केले नाही तर दबावाखाली तो किती शांतपणे खेळू शकतो याचे प्रात्यक्षिकच दिले.

मॅचमध्ये एका क्षणी तर खुद्द विराट कोहलीने सूर्यकुमारवर नजर रोखत सूर्यकुमारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण तितक्याच शांतपणे आणि त्याचीही नजर रोखून ठेवत सूर्यकुमारने प्रत्युत्तर दिले. सूर्यकुमारच्या या 'थंडपणा'चे कौतुक सर्वांनीच केले. 

सूर्यकुमारला सगळ्यात मोठी शाब्बासकीची थाप मिळाली ती रवी शास्त्रीकडून... सूर्या नमस्कार.. स्टे स्ट्राँग अँड पेशंट असं इंग्रजीमध्ये ट्वीट करून शास्त्री याने सूर्याचे कौतुक केले.