सुशांत सिंग राजपूतच्या "दिल बेचारा" च्या ट्रेलर ने मोडले अनेक रेकॉर्डस्

Thursday, 9 July 2020
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या "दिल बेचारा" चा ट्रेलर ६ जुलै रोजी यू ट्यूब आणि हॉटस्टार च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी सुशांतच्या फॅन्सनी या चित्रपटाच्या ट्रेलरला  प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे दिल बेचारा च्या ट्रेलर ने बॉलीवूड तसेच  हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्डस् मोडीत काढले आहेत. दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर हा २४ तासात सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला ट्रेलर आहे. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून चाहत्यांनी ह्या ट्रेलरवर लाईक्स चा वर्षाव केला.
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या "दिल बेचारा" चा ट्रेलर ६ जुलै रोजी यू ट्यूब आणि हॉटस्टार च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी सुशांतच्या फॅन्सनी या चित्रपटाच्या ट्रेलरला  प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे दिल बेचारा च्या ट्रेलर ने बॉलीवूड तसेच  हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्डस् मोडीत काढले आहेत. दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर हा २४ तासात सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला ट्रेलर आहे. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून चाहत्यांनी ह्या ट्रेलरवर लाईक्स चा वर्षाव केला. दिल बेचारा चित्रपटाच्या ट्रेलरने यू ट्यूबवर सर्वाधिक लाईक्स मिळवून बॉलिवूडच न्हवे तर  हॉलीवूडच्या देखील अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या ह्या चित्रपटाने आतापर्यंत 7.2 मिलियन लाईक्स मिळवले असून ह्यापूर्वी हॉलिवूड चित्रपट 'एवेंजर्स एंडगेम' ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला 3.2 मिलियन लाईक्स मिळाले होते.