संजू बाबाचा आज ६१वा वाढदिवस 

Wednesday, 29 July 2020

संजू बाबा म्हणजेच बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आज त्यांचा ६१वा वाढदिवस साजरा करीत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी संजू बाबा वर शुभेच्छांचा वर्षाव केला. संजय दत्त यांची अभिनय क्षेत्रातील सुरुवात चांगलीच गाजली. संजय दत्त हे दिवंगत अभिनेता आणि राजकारणी सुनील दत्त यांचा मुलगा असून १९८१ साली रिलीज झालेल्या रॉकी या चित्रपटातून संजय दत्त यांची बॉलीवूड मध्ये एन्ट्री झाली. रॉकी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय दत्त चे वडील सुनील दत्त यांनी केले होते. रॉकी हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. त्यानंतर संजू बाबाने अनेक हिट चित्रपट दिले.

संजू बाबा म्हणजेच बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आज त्यांचा ६१वा वाढदिवस साजरा करीत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी संजू बाबा वर शुभेच्छांचा वर्षाव केला. संजय दत्त यांची अभिनय क्षेत्रातील सुरुवात चांगलीच गाजली. संजय दत्त हे दिवंगत अभिनेता आणि राजकारणी सुनील दत्त यांचा मुलगा असून १९८१ साली रिलीज झालेल्या रॉकी या चित्रपटातून संजय दत्त यांची बॉलीवूड मध्ये एन्ट्री झाली. रॉकी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय दत्त चे वडील सुनील दत्त यांनी केले होते. रॉकी हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. त्यानंतर संजू बाबाने अनेक हिट चित्रपट दिले.  परंतु १९९२ साली मुंबई येथे झालेल्या बॉम्ब स्फोट हल्ल्यात संजय दत्त यांचे नाव गोवले गेले तसेच त्यांच्या राहत्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ ही रायफल पोलिसांना मिळाली. त्यांनतर संजय दत्त यांच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला आणि त्यामध्ये त्यांना ५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. संजय दत्त यांचे मुन्ना भाई एम बी बीस आणि लगे रहो मुन्ना भाई हे चित्रपट फार लोकप्रिय आहेत. २०१८ ला संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित संजू ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू हिरानींनी केले असून अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात संजय दत्त यांच्या भूमिकेत दिसला. संजय दत्त यांना वाढदिवसानिमित्त यिनबझ कडून खूप खूप शुभेच्छा.