अभिनेत्री तापसी पन्नूचा आज वाढदिवस 

Saturday, 1 August 2020

मुंबई :- ग्लॅमरस अभिनेत्री तापसी पन्नू आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक सिनेकलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तापसीने हिंदी बॉलीवूड चित्रपटांसोबतच टॉलीवूड म्हणजेच तामिळ, तेलगू, मल्याळम ह्या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.  सुरुवातीला तापसी पन्नू मॉडेल म्हणून अनेक प्रसिद्ध ब्रॅन्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली. तापसीचा अभिनेत्री म्हणून प्रवास तेलगू चित्रपटापासून सुरु झाला. त्यानंतर २०१३ रोजी चष्मे बहादूर ह्या हिंदी चित्रपटातून तिची बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली.

मुंबई :- ग्लॅमरस अभिनेत्री तापसी पन्नू आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक सिनेकलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तापसीने हिंदी बॉलीवूड चित्रपटांसोबतच टॉलीवूड म्हणजेच तामिळ, तेलगू, मल्याळम ह्या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.  सुरुवातीला तापसी पन्नू मॉडेल म्हणून अनेक प्रसिद्ध ब्रॅन्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली. तापसीचा अभिनेत्री म्हणून प्रवास तेलगू चित्रपटापासून सुरु झाला. त्यानंतर २०१३ रोजी चष्मे बहादूर ह्या हिंदी चित्रपटातून तिची बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर तापसीने मागे वळून कधीच पाहिलं नाही. तापसी पन्नूने अमिताभ बच्चन यांसोबत पिंक हा समाजप्रभोदन करणाऱ्या विषयाचा सिनेमा केला. त्यात तापसीने केलेल्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक करण्यात आले. त्यानंतर तापसीने गाझी अटॅक, सुरमा, जुडवा २, मुल्क, बदला, थप्पड असे अनेक चित्रपट केले. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सांड की आख ह्या चित्रपटातील तापसीची भूमिका खूप गाजली होती. यिनबझकडून तापसी पन्नूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.