बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस

Monday, 6 July 2020

बॉलीवूडचा एनर्जी मॅन म्हणून समजला जाणारा अभिनेता रणवीर सिंगचा आज ३५ वा वाढदिवस. रणवीर सिंग हा चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यानंपैकी एक असल्याने त्याचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलीवूड कलाकारांनी, तसेच त्याच्या फॅन्सनी  रणवीर वर शुभेच्छांचा वर्षाव केला. रणवीर सिंगचा जन्म हा मुंबईतील एका सिंधी कुटुंबात झाला असून त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सुरुवातील रणवीर सिंग बॉलीवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होता. २०१० मध्ये रिलीज झालेल्या  "बँड बाज बारात" ह्या रोमँटिक कॉमेडी सिनेमात त्याने मुख्य भूमिका केली.

बॉलीवूडचा एनर्जी मॅन म्हणून समजला जाणारा अभिनेता रणवीर सिंगचा आज ३५ वा वाढदिवस. रणवीर सिंग हा चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यानंपैकी एक असल्याने त्याचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलीवूड कलाकारांनी, तसेच त्याच्या फॅन्सनी  रणवीर वर शुभेच्छांचा वर्षाव केला. रणवीर सिंगचा जन्म हा मुंबईतील एका सिंधी कुटुंबात झाला असून त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सुरुवातील रणवीर सिंग बॉलीवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होता. २०१० मध्ये रिलीज झालेल्या  "बँड बाज बारात" ह्या रोमँटिक कॉमेडी सिनेमात त्याने मुख्य भूमिका केली. ह्या चित्रपटाच्या यशानंतर त्याने कधीच मागे वळून पहिले नाही. त्यानंतर रणवीर सिंगने संजयलीला भंसाळींच्या गोलीयोकी रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत ह्यासारख्या चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य दाखवले. २०१८ मध्ये अभिनेता रणवीर सिंग याने अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत विवाह केला.  २०१९ मध्ये रिलीज झालेल्या "गल्ली बॉईज" या चित्रपटासाठी रणवीर सिंगला फिल्म फेअर चा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रणवीर सिंग त्याच्या बेफिक्री स्वभावामुळे आणि त्याच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.