तुषार पवार म्हणतो किंग साईज अॅटिट्यूड पाहिजे

Friday, 30 October 2020

तुषार पवार म्हणतो किंग साईज अॅटिट्यूड पाहिजे

यशस्वी होण्यासाठी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो... शिक्षण झाल्यावर नोकरी, स्ट्रगल, नेटवर्किंग हे सगळेच करतात.. पण माॅडेलिंग करताना हे सगळं केल्यानंतर स्टेजवर तुम्ही पोचलात की मात्र घाबरायला होतं... त्यावर मात करायची असेल तर फक्त आणि फक्त अॅटिट्यूड आणि तोही किंग साईज अॅटिट्यूड पाहिजे... तुषार पवार याचा हा सल्ला तुम्ही मनावर घ्याच..

पुण्यातल्या एस व्ही युनियन शाळेत दहावीपर्यंत शिकलेला, नंतर हाॅटेल मॅनेजमेंटची पदवी आणि एचआर विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर तुषारने जाॅब करायला सुरवात केली. नोकरी करत असताना निर्णय घेतला फॅशन शोमध्ये सहभागी होण्याचा... ती स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर तिथे रिजेक्ट झाला... पण जिद्दीने त्याने नेटवर्किंग सुरू ठेवले. स्टेजवर गेल्यावर फोकस कसा ठेवायचा, मानसिकता कशी ठेवायची याचा अभ्यास केला. आणि त्यानंतर पठ्ठ्याने तीन स्पर्धा लागोपाठ जिंकल्या... केवळ भारतातच नव्हे तर थायलंडमध्ये २०१९ मध्ये झालेल्या मिस्टर एशियन इंटरनॅशनल स्पर्धेत त्याने मिस्टर फोटोजेनिक, मेन्स फिझिकमध्ये अव्वल नंबर पटकावला.

एमएक्स प्लेयरवरील एका वेबसिरिजमध्येही त्याने काम केले आहे. लाॅकडाउनच्या काळात फिटनेसवर फोकस करत आता तुषारने स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.