भारताच्या सर्वोत्तम धावपटू पी.टी. उषा यांचा आज जन्म दिवस 

Saturday, 27 June 2020

भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू पी.टी. उषा यांचा आज ५६वा वाढदिवस. पी.टी.उषा यांचा जन्म केरळ मधील कुथ्थाली या छोट्याश्या गावी झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले. पी.टी. उषा यांनी १९८० मध्ये प्रथमतः ऑलम्पिक स्पर्धांमध्ये पदार्पण केले त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रँकसूटमध्ये धावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. पी.टी.उषा यांच्या या खेळातील कामगिरीने अनेक उभरत्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. १९८३ मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड चँपियन्स स्पर्धेत पी.टी.

भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू पी.टी. उषा यांचा आज ५६वा वाढदिवस. पी.टी.उषा यांचा जन्म केरळ मधील कुथ्थाली या छोट्याश्या गावी झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले. पी.टी. उषा यांनी १९८० मध्ये प्रथमतः ऑलम्पिक स्पर्धांमध्ये पदार्पण केले त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रँकसूटमध्ये धावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. पी.टी.उषा यांच्या या खेळातील कामगिरीने अनेक उभरत्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. १९८३ मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड चँपियन्स स्पर्धेत पी.टी. उषा यांनी  ४०० मीटर स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले, तो विक्रम १९८९ पर्यंत अबाधित होता. पी.टी.उषा यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०० आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे. पी.टी. उषा यांच्या खेळातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.