सुशांत सिंग राजपूतचे "हे" फोटो शेअर करत असाल तर सावधान!; तुमच्यावर होऊ शकते "ही" कारवाई 

Monday, 15 June 2020

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ने काल त्याच्या मुंबई येथील राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूच्या बातमीने बॉलीवूड आणि त्याचा चाहतावर्ग पार हादरून गेला. अनेकांनी सुशांतचे फोटोस सोशल मीडियावर अपलोड करून त्याच्या मृत्यूबाबत आपली हळहळ व्यक्त केली . परंतु काही नेटकऱ्यांनी दिवंगत सुशांत सिंग राजपूतचे मृत अवस्थेतील काही आक्षेपार्यह फोटोस वायरल केले. महाराष्ट्र सायबर सेलने याचा निषेध व्यक्त करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेलने त्यांच्या ट्ववीटर अकाउंटवर एक महत्वाच ट्विट केल.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ने काल त्याच्या मुंबई येथील राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूच्या बातमीने बॉलीवूड आणि त्याचा चाहतावर्ग पार हादरून गेला. अनेकांनी सुशांतचे फोटोस सोशल मीडियावर अपलोड करून त्याच्या मृत्यूबाबत आपली हळहळ व्यक्त केली . परंतु काही नेटकऱ्यांनी दिवंगत सुशांत सिंग राजपूतचे मृत अवस्थेतील काही आक्षेपार्यह फोटोस वायरल केले. महाराष्ट्र सायबर सेलने याचा निषेध व्यक्त करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेलने त्यांच्या ट्ववीटर अकाउंटवर एक महत्वाच ट्विट केल. त्यामध्ये त्यांनी लिहिले कि "दिवंगत सुशांत सिंग राजपूतचे मृत अवस्थेतील फोटोस वायरल होणं हे फार चिंताजनक आहे, सोशल मीडिया वर असे फोटोस पसरवणं कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात आहे. तसेच असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते"असे ट्विट करण्यात आले आहे. तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी देखील सुशांतचे मृतावस्थेतील  फोटोस वायरल करू नका असे आवाहन केले होते.