'ह्या' मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली गळफास लावून आत्महत्या

Thursday, 30 July 2020

झी मराठी वाहिनीवरील खुलता कळी खुलेना ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या नवऱ्याने काल नांदेड येथील राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या नवऱ्याचे नाव हे आशुतोष भाकरे असून तो देखील एक अभिनेता होता. त्याने इचार ठरला पक्का, भाकर याचित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तसेच त्याने बहुचर्चित जून जुलै ह्या मराठी नाटकाची निर्मिती देखील केली होती. आशुतोषच्या आत्महत्येच्या बातमीने कुटुंबियांना तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना देखील धक्का बसला आहे.

झी मराठी वाहिनीवरील खुलता कळी खुलेना ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या नवऱ्याने काल नांदेड येथील राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या नवऱ्याचे नाव हे आशुतोष भाकरे असून तो देखील एक अभिनेता होता. त्याने इचार ठरला पक्का, भाकर याचित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तसेच त्याने बहुचर्चित जून जुलै ह्या मराठी नाटकाची निर्मिती देखील केली होती. आशुतोषच्या आत्महत्येच्या बातमीने कुटुंबियांना तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना देखील धक्का बसला आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख आणि अभिनेता आशुतोषचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात ते दोघे नांदेड येथे त्यांच्या गावी कुटुंबासोबत राहत होते. 

बुधवारी दुपारी आशुतोषची पत्नी मयुरी ही तिच्या सासूबाईं सोबत खालच्या मजल्यावर गप्पा मारत होती. तेव्हा आशुतोष वरच्या खोलीत झोपायला म्हणून गेला होता. बराच वेळ झाला तरी आशुतोष खाली आला नाही म्हणून कुटुंबातील सदस्यांनी दार वाजवलं परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बेडरूमच्या खिडकीतून पाहिलं असता आशुतोषचा गळफास लावलेला मृतदेह कुटुंबियांना दिसला. अभिनेता आशुतोष भाकरेच्या आत्महत्येच कारण अद्याप कळू शकलेल नाही.