बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस

Thursday, 16 July 2020

आपला अभिनय, सुंदरता आणि नृत्य कौशल्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज ३७वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूडमधील अनेक  कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कतरिनाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती.  तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्यावर हिंदी चित्रपटांसोबतच काही तेलगु चित्रपटानंमध्ये देखील काम केले. कतरिना ही मूळची हॉंगकॉंग ची नागरिक असून ती सध्या भारतात कामगार परवाना घेऊन राहात आहे.

कतरिना कैफच्या बॉलीवूड करिअरची सुरुवात २००३ साली प्रदर्शित 'Boom' ह्या हिंदी चित्रपटातून झाली असली तरी तिला खरी प्रसिद्धी २००७ साली रिलीज झालेल्या नमस्ते लंडन ह्या चित्रपटानंतर मिळाली. त्याचित्रपटाच्या यशानंतर कॅटरिनाच्या करियर चा आलेख नेहमी उंचावतच राहिला. अग्निपथ ह्या चित्रपटातील  कतरिनाच्या 'चिकनी चमेली' ह्या गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या भारत ह्या चित्रपटात ती झळकळी. कतरिना कैफ तिच्या अभिनया सोबतच सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्या सोबत असलेल्या प्रेम संबंधांनमुळे देखील चर्चेत राहिली. कतरिनाने सलमान खान, शाहरुख खान,आमिर खान या बॉलीवूड मधील बड्या कलाकारानं सोबतही काम केले आहे.