"ऑस्कर" पुरस्कार सोहळ्याच्या तारखेत चौथ्यांदा बदल

Wednesday, 17 June 2020

कोरोना संकटाचा फटका देश विदेशातील मनोरंजन क्षेत्रालाही बसला आहे. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला देखील कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोरोना विषाणूचा  प्राधुरभाव जगभरात वाढत असल्याने अनेक चित्रपटांची निर्मिती, प्रदर्शन थांबले म्हणून, २०२१ मध्ये होणारा हा पुरस्कार सोहळा दोन महिने पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी काही वेगवेगळ्या कारणांमुळे ऑस्कर पुरस्काराची तारीख बदलण्यात आली होती. हा सोहळा आधी  २८ फेब्रुवारी २०२१ ला होणार होता. परंतु अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडल्यामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळा आता २५ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे. 

या पुरस्काराकरिता एन्ट्रीस  २८ फेब्रुवारी पर्यंत घेतलया जाणार असून १५ मार्चला नामांकन घोषित केली जाणार आहेत.