सुपरस्टार प्रभासच्या "राधेश्याम" चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

Saturday, 11 July 2020

बाहुबली फेम अभिनेता प्रभासच्या राधेश्याम या नव्या कोऱ्या चित्रपटाच पोस्टर रिलीज झालं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा रोमँटिक अंदाजात दिसणार असून त्याच्या सोबत ह्या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. २०२० या वर्षातील सुपरस्टार प्रभासचा  हा पहिला चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे.

बाहुबली फेम अभिनेता प्रभासच्या राधेश्याम या नव्या कोऱ्या चित्रपटाच पोस्टर रिलीज झालं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा रोमँटिक अंदाजात दिसणार असून त्याच्या सोबत ह्या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. २०२० या वर्षातील सुपरस्टार प्रभासचा  हा पहिला चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. राधेश्याम हा चित्रपटाचे सहनिर्माते भूषण कुमार असून त्यांनी हे पोस्टर रिलीज करताना फोटो खाली कॅप्शन म्हणून "जब तर रहेंगे सूरज चांद, याद रहेंगे ये राधा श्याम" असे लिहिले.  प्रभासच्या ह्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर #Prabhas20 आणि #PoojaHegade हे हॅशटॅग फार लोकप्रिय होत आहेत.