बॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन
आज प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी वयाच्या ७१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला असून त्यांनी बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती. ५०च्या दशकात त्यांनी बॅकग्राऊंड डान्सरम्हणून काम केले. पुढे नृत्यदिग्दर्शिका म्हणून सरोज खान यांनी बॉलीवूडची चार दशके गाजवली. तसेच त्यांना नृत्यदिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल यांसारख्या बड्या अभिनेत्रींसाठी सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शन केले.