विनोदी अभिनेता कुशल बद्रिके यांचा आज वाढदिवस

Monday, 20 July 2020
"चला हवा येऊ द्या" फेम हास्यसम्राट कुशल बद्रिके यांचा आज ४० वा वाढदिवस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मराठी कलाकार आणि चाहत्यांनी कुशल बद्रिके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. झी मराठी वाहिनीवरील 'फूबाईफू' नावाच्या विनोदी कार्यक्रमामधून ते प्रकाश जोतात आले. त्यानंतर सलग सात वर्ष हिट असणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्यक्रमात विविध भूमिका करत असताना त्यांच्या अनोख्या विनोद शैलीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. कुशल बद्रिके यांनी मालिकांसोबतच रवी जाधव निर्मित रंपाट, बायोस्कोप, स्लॅम बुक, बकुळा नामदेव घोटाळे अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.
"चला हवा येऊ द्या" फेम हास्यसम्राट कुशल बद्रिके यांचा आज ४० वा वाढदिवस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मराठी कलाकार आणि चाहत्यांनी कुशल बद्रिके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. झी मराठी वाहिनीवरील 'फूबाईफू' नावाच्या विनोदी कार्यक्रमामधून ते प्रकाश जोतात आले. त्यानंतर सलग सात वर्ष हिट असणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्यक्रमात विविध भूमिका करत असताना त्यांच्या अनोख्या विनोद शैलीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. कुशल बद्रिके यांनी मालिकांसोबतच रवी जाधव निर्मित रंपाट, बायोस्कोप, स्लॅम बुक, बकुळा नामदेव घोटाळे अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. कुशल बद्रिके यांना अभिनयासोबतच नृत्याची सुद्धा आवड आहे. अश्या ह्या हरहुन्नरी कलाकाराला यिनबझ्झ मराठी तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.