अभिनेत्री अर्चना निपाणकरचा लग्न सोहळा संपन्न

Wednesday, 15 July 2020

झी मराठी वाहिनीवरील का रे दुरावा  ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'जुई' म्हणजेच अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा काल विवाह सोहळा संपन्न झाला आहे. तिच्या नवऱ्याचं नाव पार्थ रामनाथपुर असून ह्या दोघांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात पारपडला होता. अभिनेत्री अर्चना निपाणकर काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या,आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' ह्या हिंदी चित्रपटात आनंदीबाईंच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकली होती. अर्चनाने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

झी मराठी वाहिनीवरील का रे दुरावा  ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'जुई' म्हणजेच अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा काल विवाह सोहळा संपन्न झाला आहे. तिच्या नवऱ्याचं नाव पार्थ रामनाथपुर असून ह्या दोघांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात पारपडला होता. अभिनेत्री अर्चना निपाणकर काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या,आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' ह्या हिंदी चित्रपटात आनंदीबाईंच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकली होती. अर्चनाने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या बातमीनंतर चित्रपटसृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.