हे आहे; छत्रपती शिवरायांचं लंडनच्या बॉनहॅम्स कलेक्‍शनमधले चित्र

Wednesday, 19 February 2020

भारतात सुप्रसिध्द चित्रशाळापैंकी एक म्हणजे किशनगड शाळा होय. या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक दुर्मिळ चित्र रेखाटले होते. किशनगडचे त्यावेळेचे महाराज सावंतसिंग आणि त्यांचे आवडते चित्रकार निहाल चंद यांच्या काळातल्या शौलीत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र रेखाटले होते. सध्या हे चित्र लंडनच्या बॉनहॅम्स कलेक्‍शनमध्ये ठेवण्यात आले आहे.

चित्र अगदी निरखून पाहिले तर चित्रामध्ये काहीप्रमाणात सुवर्णकाम केलेले जाणवते. पहिल्या चित्रात एका हातात धख्खनी धोप तलवार तर दुसऱ्या हातात पट्टा दिसून येतो. तर दुसऱ्या चित्राच खांद्याला लटकवलेली ढाल आणि डाव्या हातात तलवार पाहायला मिळते.