मुंबईत रंगला तरुणांच्या मुकनाट्याचा प्रयोग

Saturday, 15 February 2020

भारतातील पहिला वाहिला 2 तासांचा मूकनाट्याचा प्रयोग आज यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. प्रख्यात सिने- नाट्य अभिनेते श्री विजय पाटकर,  गानसम्राज्ञी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सिने-अभिनेते श्री  गणेश यादव,अभिनेत्री  सुषमा देशपांडे,  सुशील इनामदार,  टाईमपास फेम प्रथमेश परब,  अभिनेत्री ऋतुजा बागवे, अभिनेते संजय खापरे अशा अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती विपुल काळे दिग्दर्शित व चेरीटेल्स प्रकाशित  "Click,  the two act mime play" या मूकनाट्याच्या मुंबईतील शुभारंभाच्या प्रयोगाला लाभली.  

श्री विजय पाटकर यांची छोटीशी मुलाखत त्यांचा सहाभिनेता गौरव मालनकर याने घेतली.  पाटकर यांनीही दिलखुलासपणे उत्तरे देत त्यांचं मूकाभिनयाशी असलेलं नातं उलगडून दाखवलं.  विशेष म्हणजे विजय पाटकर यांनी उत्स्फूर्त पणे मूकाभिनयाचं सादरीकरण केलं व त्यांनी दिग्दर्शक विपुल काळे यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच मूकनाट्यासारख्या कठीण व दुर्लक्षित नाट्य प्रकाराला इतक्या मोठ्या स्तरावर आणल्याबद्दल निर्माते अमेय समर्थ व स्विटी वर्तक यांचे विशेष कौतुक केले. पद्मश्री पद्मजा फेणाणी यांच्यासह सर्वच अतिथींनी या अद्भुत कला प्रकाराला शुभेच्छा दिल्या.