मन्नतची यशोगाथा; कलावंतीण दुर्गापासून हरिशचंद्र गडापर्यंत

Sunday, 3 February 2019

2300फुट उंच असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे फोटोमध्ये बघीतलं तरी काळजाचं पाणी होणारा गड, तर 4600 फुट उंच असलेला हरिचंद्र गड म्हणजे कल्पनाच न केलेली बरी. मात्र आज आपण अशा रणरागिणीची किमया वाचणार आणि पाहाणार आहोत जिने अवघ्या चार वर्षाच्या वयात या दोन किल्ल्यांची सर केली आहे. औरंगाबादच्या मन्नत मिन्हास हिने कलावंतीण दुर्ग आणि हरिचंद्र गडासारखे चढण्यास अवघड असलेले गड सर केले आहेत.

2300फुट उंच असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे फोटोमध्ये बघीतलं तरी काळजाचं पाणी होणारा गड, तर 4600 फुट उंच असलेला हरिचंद्र गड म्हणजे कल्पनाच न केलेली बरी. मात्र आज आपण अशा रणरागिणीची किमया वाचणार आणि पाहाणार आहोत जिने अवघ्या चार वर्षाच्या वयात या दोन किल्ल्यांची सर केली आहे. औरंगाबादच्या मन्नत मिन्हास हिने कलावंतीण दुर्ग आणि हरिचंद्र गडासारखे चढण्यास अवघड असलेले गड सर केले आहेत.

जोखमीची मोहीम सोबत जेम्स्‌च्या गोळ्या अन्‌ लेझ चिप्स घेऊन अवघ्या दोन तासातच हरिचंद्र गडाची मोहिम फत्ते करण्ययाची मन्नत असलेली हीच ती मन्नत मिन्हास. हा फक्त शहरवासियांसाठी अभिमानच नाही तर एका हेवा देखील म्हणावा लागेल. 

मन्नतचा जन्म 22 सप्टेंबर 2014 साली झाला. मन्नत सध्या लिटल वुडस्‌ शाळेत केजीमध्ये शिकत आहे. मन्नतची आई, माधवी या गोगाबाबा टेकडीवर जात असत. त्यांच्या मागे लागून मन्नत देखील टेकडीवर जात असे. त्यानंतर सहा महिन्यात तब्बल दहा ते आकरा वेळेस ती गोगाबाबा या टेकडीवर चढली.  याचदरम्यान, मन्नतची ओळख एव्हरेस्टवीर प्रा. मनिषा वाघमारे यांच्याशी झाली. 

वेगवेगळी शिखरे सर केलेले, आईच्या मोबाईलमधील फोटो पाहून मलाही तिथे जायचे आहे. असा हट्ट  करत ती या मोहिमेत सहभागी झाली. मन्नत गड चढत असताना तिची आई कधीच तिच्या सोबत नसते, फक्‍त तिच्या काही अंतर मागे किंवा पुढे हवी असते. चालत असताना ती नुसती प्रश्‍नांचा भडीमार करते. असा अनुभव तिचे साथीदार प्रा. वाघमारे आणि शशीकांत सिंग यांनी सांगितला. 

तिला जेम्स्‌च्या गोळ्या आणि लेझ चिप्स्‌ फार आवडतात, त्यामुळे जेम्स्‌च्या गोळ्या, लेझ चिप्स्‌ आणि दोन वेळचे पाणी इतक्या आहारात ती आपली मोहिम फत्ते करते. चालत असताना खाऊ काय देणार? पुढे कुठे जायचे? मी बरोबर चालते ना? अशा प्रश्नांचा भडीमार करत असते. सांगण्याचा उद्देश इतकाच, की येवढं चालूनसुध्दा तिला थकवा जाणवत नाही. प्रवास पुर्ण झाल्यावर तिचा पहिला प्रश्‍न असतो तो म्हणजे संपले का? पुढे जायचे नाही का? याचवेळी तिला आजुबाजुचे डोंगरही खुणावतात. तेंव्हा तिकडे जाण्याचा संकल्पही ती बोलून दाखवते.

पाहिले तरी अंगात कापरा भरावा असे हे डोंगर आणि त्यावर असलेले टूमदार किल्ले आहेत आणि त्यातच म्हणजे मन्नतच्या तोंडूंन निघालेले अशे प्रश्न म्हणजे आश्चर्य वाटणारे असतात. 

मोहिमेदरम्यान, इतर गिर्यारोहक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी सरसावतात. तेव्हा ती नटखट अदा सुरु करते. तिचा मुड तेंव्हाच येतो; जेंव्हा मोहीम फत्ते झाल्यानंतर हाती तिरंगा येतो. हाती तिरंगा आल्यावर ती पोज देऊनच उभी राहते.

महत्वाचा शिरस्ता असा कि, सगळ्यात पुढे आपणच असावे असे तिला वाटते. तसेच तिला जिथे तिथे फोटो काढण्याचा मोह नाहीत्यामुळेच ती इतरांच्या आधी एक तास शिखरावर पोहचलेली असते. दोन्ही गड सर करताना अपवाद वगळता अवघड वळणेही तीने लिलया पार केल्याने साथीदारांमध्ये ती कौतुकाचा विषय ठरली आहे, तिच्या या हरहून्नरी आणि धडाकेबाज कामगिरीला आपल्या तरूणाईकडून सलाम.

स्केटिंग, सायकलिंग, पेंटिंग सोबतच तिला ट्रेकिंगचीही आवड आहे. तिच्या मनात येईल त्याप्रमाणे ती वागते, तिला वाटेल ते काम करते, तिला स्वातंत्र्य आहे, कोणतीही बंधने नाही. तिच्या आईकडून योग्य ते मार्गदर्शन तिला मिळत असल्याने मी अगदी बिनधास्त आहे असं मत मन्नतचे वडील अवतारसिंग मिन्हास यांनी मांडले आहे.