कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा प्रसंग

Saturday, 24 August 2019

कोल्हापूर: आपल्या कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील करनूर गावचे सुपुत्र सागरनलवडे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने सर केला युरोप खंडातील रशिया मधील सर्वात उंच माऊंटएलब्रूसशिखर (5642meter) ते सुद्धा अवघ्या 7 तासांत ह्याची नोंद इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड ने घेतली.

कोल्हापूर: आपल्या कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील करनूर गावचे सुपुत्र सागरनलवडे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने सर केला युरोप खंडातील रशिया मधील सर्वात उंच माऊंटएलब्रूसशिखर (5642meter) ते सुद्धा अवघ्या 7 तासांत ह्याची नोंद इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड ने घेतली. तर सागर व त्यांच्या टीम ने माऊंट एलब्रूस वर गेल्यावर युरोप मधील सर्वात उंच ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्टला आपल्या देशाचा 73 फूट लांब झेंडा फडकवला व आपल्या महाराष्ट्राचाभगवाझेंडा फडकवला त्यावेळी सर्वांनी आपला कोल्हापुरीफेटा परिधान केला होता व त्याच ठिकाणी सागर यांनी छत्रपतीशिवाजीमहाराजांची मूर्तीचे पूजन केले.

आपण कोल्हापूरकर असल्याचा अभिमान उराशी बाळगून आम्ही कोल्हापूरीचा फलक रशियातील सर्वात उंच शिखरावर फडकवला व हे पाहून आम्हा कोलहपूरकरांची मान गर्वाने उंचावली हा प्रसंग आपल्या कोल्हापूरकरांच्या साठी खूप मोठा व अभिमानाचा होता. ह्यापूर्वी सागर नलवडे ने लिंगाणा सुळका बिना कोणत्याही सहाया शिवाय अवघ्या 16 मिनिटांत सर केला होता तो सुद्धा इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये विक्रम म्हणून नोंद झाला. आपल्या कोल्हापुरातील युवकाने इतकी मोठी कामगिरी केली. पण आपल्या पर्यंत ह्याची माहितीच न्हवती पण ह्या कामगिरीवर जाताने त्यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावं लागलं मोहिमेला जाण्यापूर्वी आईवडिलांचेदर्शन घ्यावे म्हणून गावी आलेला सागर पुरात अडकला स्वतःच्या घरात छाती एवढे पाणी व कोल्हापूर वरून मुंबई रस्ता बंद ह्यामुळे मोहीम रद्द होते.

की काय वाटत होतं पण आपल्या युवराजसंभाजीराजे यांनी कोल्हापूर ते बेळगाव गाडीने व तिथून विमानाने बेंगलोर व तिथून पुन्हा विमानाने मुंबई असा प्रवास करून सागर मोहिमेच्या अगदी आदल्या दिवशी मुंबईत पोचले व मोहिमेतून आल्यानंतर सुद्धा आपल्यावर आलेल्या पूरस्थिती मुळे सागर नलवडे यांनी कोणताही गाजावाजा केला नाही किंवा जल्लोष केला नाही व कोल्हापुरात परतलेल्या दिवसापासून हा युवक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी धावत आहे. त्याला अनेक माध्यम न्यूज वाल्यांनि भेटायला बोलवलं पण पहिला पूरग्रस्तांना मदत व नंतर इंटरव्ह्यू म्हणून सागर नलावडे कोणत्याही वाहिनीच्या किंवा पेपरच्या समोर गेले नाहीत. तसेच सागर पुढच्या महिन्यात आफ्रिका खंडातील टांझानिया येथील माऊंट किलीमांजारो या ५८९५ मिटर च्या हिमनागवर चढाई करणार आहेत. जगात भारी आम्ही कोल्हापुरीसागर नलावडे तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.