तरुणांच्या आधार फाऊंडेशनने केला सैनिकांच्या पालकांचा सत्कार

Friday, 16 August 2019

शिरसाड - आज 15 ऑगस्ट निमित्त शिरसाड गावातील तरुणांनी आधार फाऊंडेशनमार्फत गावातील जे तरूण सैन्यामध्ये व पोलीस खात्यात भरती झाले आहेत त्यांच्या पालकांचा घरी जाऊन सन्मान केला.

शिरसाड गावातील किरण रमेश बार्हे हे पी.एस.आय. झाले आहेत. तसेच योगीराज बापूराव वळींकार, विनायक भालचंद्र सोनवणे, संदीप सुभाष सोनवणे हे सी.आर.पी.एफ. मध्ये व संदीप विजय पाटील हे एअर फोर्स मध्ये कार्यरत आहे.

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाऊंडेशनचे संस्थापक तेजस पाटील, शिवम पाटील, अभिषेक पाटील, दीपक खंबायत, महेश कोळी, विलास कोळी, वसीम तडवी, भैरव नरवाडे, पवन धनगर, विशाल कोळी, धनंजय धनगर, दिनेश कोळी, समाधान अलकरी, निलेश कोळी, यांच्यासोबत अनेक तरुण उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती आई-वडिलांना गहीवरून आले. त्यांनी आभाराची भावना यावेळी बोलून दाखवली. तसेच आपल्या मुलाविषयी गर्व आहे की तो देशसेवा करत आहे. असे गौरवउद्गार काढले. गावातील तरुणांनी अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविल्यानंतर एक देशभक्तीचे वातावरण गावात निर्माण झाले.