मी ऑस्करचे तुकडे करणार आणि....

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020
  • सर्वजण आतुरतेने वाट बघत असणाऱ्या ९२व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. यावेळी पहिल्या दोन पुरस्कारांचा मान हॉलीवूडमधील दोन कलाकारांनी पटकावला. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिटला 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवुड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता तर अभिनेत्री लॉरा डर्न हिला 'मॅरेज स्टोरी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

सर्वजण आतुरतेने वाट बघत असणाऱ्या ९२व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. यावेळी पहिल्या दोन पुरस्कारांचा मान हॉलीवूडमधील दोन कलाकारांनी पटकावला. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिटला 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवुड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता तर अभिनेत्री लॉरा डर्न हिला 'मॅरेज स्टोरी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

कॅलिफोर्नियामधील लॉस एंजिलिस या शहरात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली आहे. आपल्याला  मिळालेला पुरस्कार हा आपल्या मुलाला अर्पण करत असल्याचे  ब्रॅड पिट याने पुरस्कार स्वीकारताना सांगितले. ब्रॅड पिट सोबतच एंथनी हॉपकिन्स, टॉम हैंक्स,  अल पचीनो आणि जोए पेस्की यांनादेखील सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. परंतु या पुरस्काराचा मानकरी ब्रॅड पिट ठरला असून त्याने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

सर्वोत्कृष्ठ चित्रपट म्ह्णून दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ऑस्करच्या इतिहासात प्रथमच इंग्रजी भाषेच्या व्यतिरिक्त कोरियन भाषेतील या चित्रपटाने ऑस्करच्या बाहुलीवर सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं आहे. बोंग जून हो आणि हान जिन यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ पटकथेचा आणि कथालेखक म्हणून  पुरस्कार मिळाला आहे.याचा आनंद व्यक्त करत असताना  बोंग जून म्हणाले की, जर ऑस्करने मला परवानगी दिली तर मला या पुरस्काराचे पाच तुकडे करून माझ्या इतर सहकाऱ्यांनाही हा पुरस्कार द्यायच्या आहे. कारण या चित्रपटाला मिळालेल्या या दैदिप्यमान यशामध्ये तुमचा सर्वांचा तितकाच वाटा आहे.  बोंग जून यांनी व्यक्त केलेल्या या वक्तव्यावर उपस्थित सर्व कलाकार हसू लागले.  या यशानंतर 'पॅरासाईट'  चित्रपटाने ऑस्करच्या इतिहासात आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News