IIT सुरु करणार बायोमिमिक्री कोर्स; जाणून घ्या खास वैशिष्ट्यै

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020

इंडीयन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रासने बायोमिमिक्री नावाचा एक नवीन कोर्स तयार केला. सामाजातील वेगवेगळ्या घटकांना व्यक्त होण्यासाठी हा कोर्स निर्माण करण्यात आला.

नवी दिल्ली : समाजासाठी उपयुक्त असणारे विविध कोर्स आयआयटी मद्रास निर्माण करत असते. इंडीयन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रासने बायोमिमिक्री नावाचा एक नवीन कोर्स तयार केला. सामाजातील वेगवेगळ्या घटकांना व्यक्त होण्यासाठी हा कोर्स निर्माण करण्यात आला याविषयी आयआटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
 
बायोमिमिक्री कोर्स फक्त अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि डिझाईन विभागाच्या विद्यार्थ्यांना नाही, त्याचा उपयोग व्यवस्थापन, मानव संसाधन, प्रशासन, समाजिक शास्त्र, आर्ट्स अशा विविध शाखांना होईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बायोमिमिक्री शिकण्याची खूप आवड असते. बायोमिमिक्री निसर्गातील वेगवेगळे इनोव्हेटिव्ह कल्पना व्यक्त करण्याच माध्यम आहे. बायोमिमिक्री जीवनाला एक स्थायुरूप प्राप्त करून देते. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासने बायोमिमिक्री कोर्ससाठी एक कम्युनिटी सिस्टिम तयार केली आहे. त्याद्वारे संशोधन, नव निर्मिती, प्रयोगशिल व्यक्तीचा शोध सुरु आहे. बायोमिमिक्री शिकण्यासाठी बायोलॉजिस्ट, अभियंता असण्याची गरज नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा असले आवश्यक आहे. बायोमिमिक्री  निसर्गाला शिकवण्यासाठी नाही तर निसर्गापासून शिकण्यासाठी आहे. उदाहरणार्थ  किंगफिशरने पक्षांपासून प्रेरणा घेतली, जापान मधील शिंकानसेन पासून बुलेट ट्रेन, जिम्बांबेमध्ये ईस्टगेट सेंटर, टर्माइंट पर्वत हे निसर्गापासून प्रेरित आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News