अंतिम वर्षांच्या परीक्षामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थांकडे दुर्लक्ष

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Tuesday, 1 September 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपूर्वी घेण्याचा निर्णय देखील दिला आहे.

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपूर्वी घेण्याचा निर्णय देखील दिला आहे. परंतु राज्य सरकारने विद्यार्थांच्या हितासाठी या परीक्षा घरातून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोणत्याही विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज नाही यासाठी राज्य सरकारने हा पर्यायी मार्गाची निवड केली आहे. परंतु यात राज्य सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थांचा विचार केला आहे का? ग्रामीण भागात वीज अनियमित पुरवठा, नेटवर्क समस्या असे अनेक प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थांचे आहेत. काही ग्रामीण भागातील विद्यार्थांकडे ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीत मग अशा विद्यार्थांनी परीक्षा कशा द्याव्यात यांचा राज्य सरकारने विचार केला आहे का? अंतिम वर्षांच्या परीक्षा या घरातूनच देता येणार आहेत, परंतु यात ग्रामीण भागातील विद्यार्थांचा विचार केला आहे का? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार केला आहे की, नाही हे मी ठाम पणे नाही सांगू शकत. पण ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना याचा तोटा हा नक्कीच होईल. याचे कारण असे की, ग्रामीण भागात पुरेसा विद्युतपुरवठा उपलब्ध नसतो. यासोबतच मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा ही पुरेशी नसते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याअगोदर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सर्वोतोपरी विचार करावा असे माझे मत आहे.

- श्रद्धा ठोंबरे

अंतिम वर्षाच्या परीक्षा या घराघरातून देता येणार आहेत हा निर्णय झाला आहे. या निर्णयावर पहिले मला बोलावसं वाटतंय हा जो निर्णय आहे हा निर्णय घेण्यामागचे कारण किंवा हा निर्णयाचा विचार करण्यामागचे कारण असे असावे की, इंटरनेट आणि मोबाईल आणि समाज माध्यमे आज ज्याच्या त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. उदा., आज आपण पाहतो ज्यावेळेस टिकटॉकचा ट्रेंड होता त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा टिक टॉकच्या माध्यमातून त्यांची कला दाखवायचे की, याचा अर्थ त्यांच्याकडे मोबाईल सारखी साधने उपलब्ध आहेत आणि समाज माध्यमांसाठी इंटरनेट सुद्धा आहे. खेड्यातला, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा शहरातील असुदे १५ वी पर्यंतच्या टप्पा कुठल्याही प्रकारे इंटरनेटचा वापर न करता  विद्यार्थ्यांनी पार पाडला असे शक्य नाही कारण इतके सगळे आंतरजालाच्या माध्यमातून आज घडत आहे त्याच्यामुळे हा निर्णय या सगळ्याचा सारासार विचार करून घेतला असावा असे मला वाटते.

परंतु तरीसुद्धा आज-काल आपण पाहतो की, आपणही इंटरनेटच्या माध्यमातून आज घरी कॉलेज किंवा शाळेतले लेक्चर्सला बसत आहोत या मध्ये सुद्धा कित्येकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो. मग ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे नव्यानेच आंतरजाल आलेला आहे. तिकडे पंधरावी सारखी एवढी मोठी परीक्षा घेत असताना इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होऊ शकेल याचा विचार केला पाहिजे, सुरळीत परीक्षा होईल की, नाही त्याबद्दल कुठेतरी साशंकता निर्माण करणाऱ्या गोष्टी यामुळे निर्माण होतात. त्यामुळे या गोष्टी वरती लगेच शिक्‍कामोर्तब न करता थोडा विचार व्हावा, व्यवस्थित सर्वेक्षण करून तसेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर्वेक्षण करून या निर्णयावर शिक्कामोर्तब करावा.

- गार्गी गोरेगावकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News