IGNO विद्यापीठ सुरु करणार 'ही' ऑनलाईन स्किल कोर्सेस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

भविष्याची पावले उळखून इंदीरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीवाल यांनी बुधवारी (ता. 20) विविध ऑनलाईन कोर्सेस सुरु करण्याची घोषणा केली. इंदीरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे पर्यटन, महात्म गांधी आणि शांती अध्यायन, हिंदी आदी विषयाची ऑनलाईन पदव्युत्तर पदवी, औद्योगीक माहिती, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान प्रमानपत्र कोर्स सुरु होणार आहे. भविष्याची पावले उळखून इंदीरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोईस्कर होईल. पुढील काळात पदवी, पदव्युत्तर, पदविका, प्रमाणपत्र आणि स्किल कोर्सेस ई- लर्निगद्वारे शिकवले जाणार आहेत. 

डिजीटल माध्यमात अभ्यासक्रम उपलब्ध

विविध अभ्यासक्रमाचे साहित्य डिजीटल स्वरुपात उपलब्ध होणार आहे. ऑडीओ, व्हिडीओ लेक्टर, पीडीएफ स्वरुपात विद्यापीठाच्या संकेत स्थळावरुन विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेता येणार आहे. ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी भारत सरकराने 'पढे भारत ऑनलाईन' अभियानाची सुरुवात केली. राष्ट्रीय डिजीटल ग्रंथालय, स्वंय प्रभा आणि दिक्षाप्रमाणे इंदीरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने डिजीटलायझेशनचे पाऊल उचलले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन सुरु केले. राज्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांना सुट्टी जाहीर केली. २१ दिवसानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला आणि ३ मे पर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 17 मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवले. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे 31 मे रोजी चौथा टप्पा संपणार आहे. त्यांतर महाविद्यालय केव्हा सुरु होतील हे निश्चित नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News