कॅमेरा घेतात, तर ही माहिती तुमच्यासाठीचं आहे...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

फोटोग्राफीची सुरवात होते ती म्हणजे कॅमेरा घेण्यापासून.  बाजारात सध्या दोन प्रकारचे कॅमेरे उपलब्ध आहेत. एक म्हणजे पॉईंट-टू-शूट कॅमेरा आणि प्रोफेशनल डीएसएलआर.

हातात मोबाईल असो कॅमेरा. फोटोग्राफी करणं हे लहानापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. आज आपण त्याच फोटोग्राफीचे काही प्रकार. फोटोग्राफ़ीसाठी वापरण्यात येणारे कॅमेरेचे प्रकार जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेराचे फायदे-तोटे आज आपण जाणून घेणार आहोत. 

फोटोग्राफीची सुरवात होते ती म्हणजे कॅमेरा घेण्यापासून.  बाजारात सध्या दोन प्रकारचे कॅमेरे उपलब्ध आहेत. एक म्हणजे पॉईंट-टू-शूट कॅमेरा आणि प्रोफेशनल डीएसएलआर. त्याचबरोबर एसएलआर कॅमेरा सुद्धा उपलब्ध आहेत. दिवसागणित या एसएलआर कॅमेराची किंमत कमी होताना दिसत आहे. 

पसंती असलेल्या कॅमेरामध्ये पहिला कॅमेरा असतो तो म्हणजे पॉईंट-टू -शूट कॅमेरा.

पॉईंट-टू -शूट कॅमेराची वैशिष्टये- 

 

 • आकाराने हलका, ने आन करण्यासाठी सोपा. 
 • वजनाला हलका असतो. 
 • फिक्स लेन्स असते. 
 • उत्तम व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध असते. 
 • सर्वसामान्य लोकांना परवडेल अश्या किंमतीत पॉईंट-टू-शूट हा कॅमेरा उपलब्ध असतो. 

पॉईंट-टू -शूट कॅमेराचे तोटे- 

 

 • लेन्सची क्वॉलिटी कमी असल्यामुळे फोटो स्पष्ट येत नाहीत. 
 • फोकसमध्ये फरक जाणवतो. 
 • नाईट फोटोग्राफीमध्ये वाव नाही. 

डीएसएलआर कॅमेराची वैशिष्टये -

 

 • उत्तम इमेज क्वालिटी 
 • कमी प्रकाशात देखील उत्तम फोटो काढता येतात. 
 • शटर स्पीड हाताळता येते. 
 • ६ ते ७ वर्ष योग्य रीतीने कामाला येतो. 
 • लेन्स बदलता येते. 

डीएसएलआर कॅमेराची तोटे - 

 

 • वजनाने जड असतात, व मोठे देखील असतात. 
 • किचकट पर्याय असतात. 
 • मोठ्या किंमतीत बाजारात उपलब्ध असतात. 

कॅमेरा कोणताही असो त्याचा कशाप्रकारे वापर करणे हे आपल्या हातात असते. वेगवेगळे पर्याय वापरून उत्तम फोटोग्राफी करता येते. जर तुम्हाला योग्य फ्रेम, आणि योग्य अँगल समजत असेल तर आपण उत्तम फोटोग्राफर होऊ शकतो हे नक्की आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News