'पीएम निधी'चे दोन हप्ते चुकविले तर कर्जबुडवे ठरणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

'पीएम निधी'चे दोन हप्ते चुकविले तर कर्जबुडवे ठरणार

'पीएम निधी'चे दोन हप्ते चुकविले तर कर्जबुडवे ठरणार

मुंबई - कोरोनाच्या काळात अख्या जगाचं अर्थिक चक्र कोलमडलं आहे. त्यातचं कर्जाचे दोन हप्ते चुकले तर कर्जबुडवे घोषित करणार असल्यामुळे मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या पीएम निधी कर्ज योजनेला नापसंती दर्शवली आहे.

कोरोनामुळे मुंबईतल्या फेरीवाल्यांनाही मोठा फटका बसला आहे. कारण कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काही महिने मुंबई बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेद्वारे फेरीवाल्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईतील सुमारे ९० हजार फेरीवाल्यांचा लाभ घेता येणार आहे. पीएम निधीद्वारे फेरीवाल्यांना १० हजारांचे कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज नवा व्यवसाय तसेच भांडवलासाठी असून फेरीवाल्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. पण त्यात कागदपत्रांसहित जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. समजा दोन हप्ते जरी चुकले तरी कर्ज बुडवा म्हणून पालिका व्यवसाय ताब्यात घेऊ शकते.

पालिका आयुक्तांबरोबर फेरीवाले आणि केंद्रीय गटातील झालेल्या बैठकीत आक्षेप घेत नापसंती दर्शवली. या जाचक अटी आम्हाला मान्य नाहीत, त्या रद्द करा अन्यथा आम्हाला कर्ज नको असं फेरीवाल्याचं म्हणणं आहे. पण फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींच काय मत आहे ते मांडावे अशी सुचना सहआयुक्तांनी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News