कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वचाचणी करता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020
  •  कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सोसायटीच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेले महाकवच ऍप, स्वचाचणी साधने, टेलिमेडिसिन हेल्पलाईन यांचा आतापर्यंत राज्यातील लाखो लोकांनी वापर केला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध असून, कोरोनाचा प्रसार पाहता आवश्‍यकतेनुसार नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले आहे. कोरोनाची शक्‍यता वाटत असल्यास https://covid-19.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर स्वचाचणीच्या (सेल्फ असेसमेंट टूल) आधारे नागरिक स्वत: प्राथमिक स्वरूपाची चाचणी करू शकतात. 

त्वरित वैद्यकीय सल्ला आणि इतर संबंधित संपर्कांचा तपशीलदेखील या लिंकवर उपलब्ध आहे. कोविडविषयक माहिती आणि मदतीसाठी 9513615550 ही टेलिमेडिसिन हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर फोन करून नागरिक कोरोना संबंधित लक्षणांचे स्वत:चे स्क्रिनिंग करू शकतात; तर रुग्णांच्या कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी महाकवच ऍप तयार करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News