तुमच लग्न जुळत नाही तर या रेल्वेने करा प्रवास !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019

वय वाढलं की लग्न जुळतं नाही मग, लग्न जुळवण्यासाठी अनेक ऑनलाईन ऑफ लाईन विवाह संस्था सुरु झाल्या आहेत. चीन देशाने अशाच अविवाहित तरूण-तरूणींचं लग्न जुळवण्यासाठी एक आगळी वेगळी रेल्वे सुरू करण्यात आली आहे

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण असतो. आधुनिक जीवन शैलीत शिक्षण, नोकरी, करिअर याला तरुणाई अधिक महत्त्व देत असते. त्यामुळे युवत- युवतींचे वय वाढत चालले आहे. वय वाढलं की लग्न जुळतं नाही मग, लग्न जुळवण्यासाठी अनेक ऑनलाईन ऑफ लाईन विवाह संस्था सुरु झाल्या आहेत. चीन देशाने अशाच अविवाहित तरूण-तरूणींचं लग्न जुळवण्यासाठी एक आगळी वेगळी रेल्वे सुरू करण्यात आली आहे.

 
चोंगकिंग नॉर्थ स्टेशन ते कियानजियांग स्टेशन दरम्यान ही विशेष "लव्ह स्पेशल रेल्वे" १० ऑगस्टला सुरू करण्यात आली.  लव्ह स्पेशल रेल्वेत एक हजारांपेक्षा अधिक तरूण-तरूणी प्रवास करत आहेत. तरुणाई कडून या रेल्वेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ही रेल्वे आठ दिवसातून दोन वेळा चालवण्यात यावी अशी मागणी तरुणाईने रेल्वे प्रशासनाला केली आहे.  
 

चीन देशाची लोकसंख्या सर्वांधित असल्यामुळे १९७० पासून एका अपत्याला परवाणगी देण्यात आली होती. त्यामुळे मुला-मुलींचा दर विस्कटला होता व तरुणाईला लग्नासाठी अनेक समस्या निर्माण होत होत्या. २०१६ मध्ये एक अपत्य धोरण रद्द करण्यात आले. तरी चीनमध्ये साधारण २० कोटी लोक अविवाहित आहेत. 
 

अविवाहितांच लग्न जुळण्यासाठी आता चक्क लव्ह स्पेशल रेल्वे सुरु करण्यात आली आहे. यामुळे सरासरी १० टक्के लग्न जुळत आहेत. २०१८ मध्ये एक हजारांपैकी केवळ ७.२ टक्केच लोकांना लग्न करण्याची संधी मिळाली होती. या आकडेवारीमुळे चीनमध्ये लग्नाचा दर गेल्या एक दशकापेक्षाही सर्वात कमी राहिला. 
 

एका वृत्तपत्र संस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेत प्रवास करणारा तरुण हुआंग सॉन्ग म्हणाला की, जोडीदार शोधण्यासाठी ही केलेली युक्ती फारच चांगली आहे. यामुळे प्रवास तर करायला मिळतोच पण, सोबतच जोडीदारही सहजपणे उपलब्ध होतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News